पर्सनल ब्रॅण्डिंग काय आहे? – तुमच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही ते कसे करावे? – ५ सोप्या पद्धती.

पर्सनल ब्रॅंडिंग म्हणजे एखादी व्यक्ती (किंवा युझर) आणि त्याचे करियर हे ब्रँड म्हणून मार्केटिंग करण्याची पद्धत.

पर्सनल ब्रँडिंगच्या प्रक्रियेत आपले वेगळेपण शोधणे, ज्या गोष्टींसाठी आपण ज्ञात होऊ इच्छिता त्या गोष्टींवर स्वतः ची प्रतिष्ठा (REPUTATION) निर्माण करणे, व नंतर आपण स्वत: त्या गोष्टी साठी ओळखल्या जाण्या साठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे होय. त्या गोष्टीचा विषय निघाला तर आपले नाव युझर्स च्या मनात आणि ओठावर आले पाहिजे. आणि आपले नाव आले म्हणजे त्या गोष्टींची आठवण युझर्स ला झाली पाहिजे... इतपत.

उदाहरणार्थ: संदीप माहेश्वरी - म्हणजे मोटिव्हेशनल स्पीकर हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मोटिव्हेशनल स्पीकर चा विषय निघाला तर संदीप माहेश्वरी ची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.  

मोटिव्हेशनल स्पीकर हाच  विषय असेल तर संदीप माहेश्वरी या सोबतच रॉबिन शर्मा, विवेक बिंद्रा, उज्वल पाटणी, सोनू शर्मा या सगळ्यांची सुद्धा आठवण होतेच.
  
त्याच प्रमाणे निल पटेल, सिद्धार्थ राजसेकर,अवि आर्या इत्यादी मंडळी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रा मध्ये त्यांच्या प्रचंड योगदाना बद्दल ओळखले जातात. 

याच प्रमाणे प्रत्येक क्षेत्रात नावाजलेली मंडळी आहेत.  

वरील सर्व मंडळींनीही त्यांच्या क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे व त्या साठी ते ओळखले जातात. थोडक्यात त्यांचे पर्सनल ब्रॅण्डिंग फार स्ट्रॉंग आहे.

वरील नावे सु-प्रसिद्ध लोकांची वाटत असणार आणि “आपण एवढे मोठे होऊ शकतो का?” असाही प्रश्न निर्माण होत असणार. पण एक लक्षात घ्या हि सर्व मंडळी एकेकाळी सर्व साधारण होती, त्यांनी सुद्धा केंव्हा तरी सुरवात केली आणि आज ते त्यांच्या क्षेत्रात आयकन झाले आहेत.

पर्सनल ब्रॅंडिंग हेच काम आपण सर्व आप-आपल्या आवडत्या क्षेत्रात सुद्धा सहज पणे करू शकतो – नव्हे प्रत्येकाने ते केलेच पाहिजे. येणाऱ्या काळात पर्सनल ब्रॅण्डिंग झालेल्या व्यक्तींची त्यांच्या क्षेत्रात मोठी ओळख निर्माण होईल व त्यांच्या यशात पर्सनल ब्रॅण्डिंग चा मोठा वाटा असेल यात शंका नाही. या उलट जर पर्सनल ब्रॅंडिंग जर दुर्लक्षित केले तर त्या व्यक्तीला स्वतः ची ओळख निर्माण करण्याचे काम जिकरीचे होईल.

थोडक्यात प्रत्येक साठी पर्सनल ब्रॅंडिंग हे महत्त्वपूर्ण आहे.

पर्सनल ब्रॅण्डिंग का करावे?

१. अर्थार्जन (income) किंवा मिळकती साठी – हे income वा मिळकत तुमचा मुख्य स्रोत – main source of income – असू शकते किंवा तुमची पर्यायी (optional) मिळकत असू शकते…

२. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. स्वतः ला public figure करण्यासाठी.

३. ज्या विषयात तुम्ही निपुण (एक्स्पर्ट) आहात त्या विषय बद्दल युझर्स ला किंवा फॉलोवर्स ला मार्गदर्शन करण्यासाठी. बऱ्याच युझर्स तुम्हाला अवगत असलेल्या विषया मध्ये करियर करत असतात व काही ठिकाणी त्यांना अडथळे येत असतात… तुमचे मार्गदर्शन त्यांना बहुमोलाचे ठरू शकते.

४. लोकांचा (युझर्स चा) फायदा करण्यासाठी किंवा त्यांचे होणारे नुकसान वाचवण्यासाठी.

५. तुमच्या स्वतः मध्ये तुमच्या विषया बद्दल अधिक निपुणता (expertise ) आणण्या साठी.

६. उत्तरोत्तर आनंददायी व समृद्ध जीवन जगण्यासाठी (my favourte reason 🙂 ).

वरील पैकी सर्वच किंवा कुठलेही एक कारण तुम्हाला पर्सनल ब्रॅण्डिंग सुरु करण्यास पुरेसे आहे.

सुरवात कशी कराल?

एखाद्या विषयात तुम्ही एक्स्पर्ट आहात हे तुम्हाला स्वतःला लक्षात यायला पाहिजे.

तुम्ही एखाद्या क्षेत्रात एक्स्पर्ट आहात हे तुम्हालाच ठरवायचे असते. हे ठरविण्यासाठी तुमची तुलना दुसऱ्या एखाद्या एक्स्पर्ट व्यक्तीशी तर अजिबात करू नका मग ती व्यक्ती तुमच्याच क्षेत्रातली का असेना. असे केल्यास तुम्ही स्वतः चा अपमान करत असता. तुम्हाला स्वतः बद्दल विश्वास असणे गरजेचे आहे.

तुमचा बॉस, ऑफिस मधील सहकारी, किंवा कस्टमर्स, नातेवाईक, मित्र मंडळ, शेजारी-पाजारी तुमच्या स्किल-सेट ची वाह-वाह करतील अशी अपेक्षा करू नका. आज प्रत्येक व्यक्ती स्वतः मध्ये गुंतलेली आहे व सेल्फ-सेंटर्ड झालेली आहे, अशा वेळेला त्यांच्या कडून तुम्ही तुमच्या स्किल-सेट बद्दल घेत असलेल्या निर्णयाबद्दल विचारणा करणे म्हणजे स्वतः चे हसे करून घेण्या सारखे आहे व स्वतः वर आत्मविश्वास नसल्या सारखे आहे.

तुमच्या स्किल-सेट बद्दल घेत असलेल्या निर्णयाबद्दल विचारणा करायचीच असल्यास एखादी खूप जवळची व्यक्ती, ज्यांचावर तुमचा विश्वास आहे, जे तुम्हाला व इतरांना करिअर मध्ये पुढे जाण्यास नेहमी प्रोत्सहन देतात, तुम्हाला समजून घेतात आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वतः काहीतरी ठोस कामगिरी एखाद्या क्षेत्रात केली आहे – अशा व्यक्तीस विचारणा करू शकता.

स्वतःची पाठ थोपटवून घ्यावी व मार्केट मध्ये यावे. तुम्ही एखादा विषय घेऊन मार्केट मध्ये येण्याचा निर्णय घेत असाल तर नकारार्थी बोलणारे अनेक सापडतील. म्हणून इतरांना विचारू नका, कारण सकारात्मक सल्ला देणारे फार कमी मिळतात. तुम्हाला स्वतः वर विश्वास असेल तर मार्केट मध्ये उडी मारा, कोण काय म्हणेल असा विचार करत बसाल कराल तर कधीच काही करू शकणार नाही.

पर्सनल ब्रॅण्डिंग कुणी करायला पाहिजे?

मी तीन विभाग केलेले आहेत, त्या पैकी तुम्ही कुठल्या विभाग मोडता ते पहा… 🙂

विभाग १. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात, मग ती नोकरी असो प्रोफेशन किंवा बिझनेस, ते क्षेत्र जर तुम्हाला मनापासून आवडते आहे, आणि तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करीत आहात, तुम्हाला तुमच्या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आहे तर पर्सनल ब्रॅण्डिंग तुम्ही केलेच पाहिजे…

विभाग २. तुमच्या नोकरी किंवा बिझिनेस क्षेत्रा व्यतिरिक्त तुमच्या कडे कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात विशेष कौशल्य आहे म्हणजेच unique skill-set आहे, त्या क्षेत्रात काम करायला तूम्हाला अतीव आवडते व तुम्ही त्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करू शकता, तुमच्या या कौशल्याचा उपयोग करून अर्थार्जन होऊ शकते असा तुमचा विश्वास आहे… तर तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात असेलेल्या कौशल्या बद्दल चे स्वतः चे (पर्सनल) ब्रॅण्डिंग केलेच पाहिजे…

विभाग ३. तुमच्या जवळ सध्या भरपूर रिकामा वेळ आहे आणि अर्थार्जनाचे कुठलेच ठोस काम सध्या तुम्ही करीत नाही. तुम्हाला स्वतः वर विश्वास आहे. एखाद्या क्षेत्रात काम करायला तुम्हाला आवडते आहे व त्या बद्दल चे ज्ञान घेऊन त्या क्षेत्रात बिझनेस सुरु करायचा तुमचा मानस आहे... तर तुमच्या आवडीचे ते क्षेत्र निवडून, तुम्ही बिझिनेस प्लॅन केला पाहिजे व पर्सनल ब्रॅण्डिंग तर करायलाच पाहिजे…

आपल्या पैकी प्रत्येक जण वरील ३ पैकी एका विभागाशी नक्कीच संबंधित असेल. मी स्वतः १० वर्षांपूर्वी विभाग २ मध्ये होतो आणि आता विभाग १ मध्ये. 🙂

पर्सनल ब्रॅण्डिंग च्या ५ सोप्या पद्धती

१. तुमची स्वतः ची वेबसाईट – ज्या मध्ये तुम्ही तुमच्या बद्दल ची सविस्तर माहिती दिलेली असते – जशी तुम्ही तुमच्या बायो डेटा किंवा रेझ्युमे देता तशी. जरका तुमचा बायोडेटा तयार नसेल तर तो करा म्हणजे त्यावरून तुमची वेबसाईट करायला तुम्हाला सोपे होईल.

२. तुमचा स्वतः चा ब्लॉग – तुमची स्वतः ची वर्डप्रेस वेबसाईट तयार असेल तर तुमचा ब्लॉग चा प्लॅटफॉर्म सुद्धा पर्यायाने तयार होतो. ब्लॉगिंग करणे अतिशय सोपे आहे. तुम्हाला आकर्षक टायटल किंवा हेडिंग ठरवायचे असते (त्याच्या खूप सोप्या पद्धती आहेत)आणि त्या बद्दल किमान १००० ते ५००० शब्दांचा ब्लॉग लिहिणे अपेक्षित असते. माझ्या मते तुम्ही एका आठवड्यात २ ब्लॉग्स लिहिणे सर्वोत्तम -म्हणजेच वर्षातून १०० ब्लॉग्स पेक्षा जास्त लिखाण तुमचे ऑनलाईन जाते व ते तुमच्या प्रतिष्ठे साठी खूप उपयुक्त आहे. एक ब्लॉग लिहायला सुरवातीला साधारणतः ८ तास लागू शकतात, सवयी नुसार नंतर हि वेळ ४ तासा पर्यंत किंवा त्याहून कमी होऊ शकते.

३. वलॉंगिंग (Vlogging) – व्हिडीओज् – एखाद्या विषयावर स्वतः चा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो युट्युब / फेसबुक व तुमच्या ब्लॉग वर टाकणे अत्यंत सहज शक्य आहे. तुमच्या स्मार्ट फोन चा कॅमेरा किंवा लॅपटॉप / डेस्कटॉप चा वेब कॅमेरा या साठी उत्तम. एखाद्या टायटल वर तुमचा ब्लॉग तयार असल्यास त्याच टायटल संबंधित व्हिडीओ तयार करणे जास्त सोपे जाते कारण त्यावर मुद्देसूद ब्लॉगिंग तुमचे अगोदर झालेले असते. याचा अर्थ तो ब्लॉग वाचून व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे नव्हे. कारण ब्लॉग वाचणाऱ्या आणि व्हिडीओ बघणाऱ्या दोन्ही युझर्स चा माईंड सेट वेगवेगळा असतो.

तुमचा स्वतः चा व्हिडीओ करतांना शक्यतोवर तो एकाच कट मध्ये झाला असला पाहिजे याची काळजी घ्या. एडिट केलेल्या व्हिडिओ पेक्षा एक सलग व्हिडिओ युझर्स ला जास्त खिळवून  ठेवतो किंवा engage करतो आणि आपल्याला अपेक्षित असलेला ठसा (impression) युझर्स च्या मनात निर्माण करतो. तुमचा सलग किंवा uncut  व्हीडिओ मध्ये थोड्या फार प्रमाणात काही अडथळे असतील तरीही चालतात. किंबहुना तुमचा व्हिडिओ किती खरा आहे याचेच ते एक प्रतीक मानले जाऊ शकते. याचे अजून एक कारण म्हणजे सलग व्हिडिओ त्या विषया वरचे तुमचे प्रभुत्व दाखवतात तर एडिटेड व्हिडिओ मध्ये तुम्ही प्रत्येक पॉईंट वर वेग-वेगळी तयारी करून किंवा पाठांतर करून बोलता आहेत असेही इम्प्रेशन तयार होऊ शकते जे तुमच्या ब्रॅण्डिंग साठी मारक ठरू शकते.  

४. सोशल मीडिया – फेसबुक / लिंक्ड इन / युट्युब / ट्विटर व गुगल माय बिझनेस (GMB) यावर तुमचे ब्लॉग्स व व्हिडिओस अपलोड झाले पाहिजेतच. – थोडक्यात याच साठी आपण सगळा अट्टाहास करत असतो – कारण इथूनच तुमचा ब्लॉग वा व्हिडिओ नैसर्गिक पद्धतीने युझर्स पर्यंत जातो (push होतो) व त्या ब्लॉग वा व्हिडीओ ला व्हिसिबिलीटी मिळते.

GMB हे सोशल मीडिया चे माध्यम नव्हे तरीही बऱ्याच अंशी ते सोशल मीडियाचे काम करते. GMB जर ब्लॉग किंवा व्हिडीओ GMB युझर्स ला push करत नाही तर मग GMB का?.. कारण युझर जेंव्हा गुगल वर तुमचे नाव टाईप करतात (किंवा व्हॉइस आऊट करतात) तेंव्हा गुगल प्रामुख्याने व ठळकपणे (prominently) तुमची GMB वरील माहिती सर्व प्रथम सादर करते. थोडक्यात तूमच्या इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या अगोदर युझर्स ला GMB दिसते. साहजिकच युझर्स चे लक्ष तुमच्या GMB कडे जाते व तिथे तुमच्या बद्दल चे इम्प्रेशन युझर च्या मनात तयार होण्यास मदत होते.

५. पॉडकास्ट - म्हणजेच संगणकावर किंवा मोबाइल डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऐकण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध केलेली डिजिटल ऑडिओ फाईल, विशेषत: मालिका (series) म्हणून उपलब्ध असतात व त्यातील नवीन अपलोड्स  युझर्स आपोआप प्राप्त करू शकतात.
पॉडकास्ट हे एक वेगाने लोकप्रिय होत असलतेले माध्यम आहे. एखाद्या विषयावर तुम्ही बोलून रेकॉर्ड केलेला तुमचा आवाज पॉडकास्ट च्या माध्यमातून युझर्स  ऐकतात.मोबाईल ला connected हेडसेट कानात टाकून शांतपणे ऐकत राहून माहिती ग्रहण करणे अनेकांना आवडते. याचे कारण तुम्ही बोलत असलेला प्रत्येक शब्द युझर्स च्या थेट मेंदूं पर्यंत पोहचत असतो. तेही कुठल्याही distraction शिवाय. संपूर्ण एकाग्र चित्त होऊन पॉडकास्ट वरील रेकॉर्डिंग ऐकल्यास त्या विषयाचा  नेमका अर्थ अवगत होतो.  आणि इथेच पॉडकास्ट हे ब्लॉग किंवा व्हिडिओ पेक्षा उजवे ठरते व म्हणूनच ते एक वेगाने लोकप्रिय होणारे माध्यम आहे. 

पर्सनल ब्रॅण्डिंगसाठी वेबसाईट करणे, ब्लॉगिंग करणे, स्वतः चा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, सोशल मीडिया वापरणे किंवा पॉडकास्ट करणे हे काही रॉकेट सायन्स राहिलेले नसून थोडीशी हिम्मत दाखविल्यास, थोडेसे ज्ञान घेतल्यास व न थांबता प्रयत्न करीत राहिल्यास – पर्सनल ब्रॅण्डिंग हे प्रत्येक व्यक्ती अगदी सहज पणे करू शकते व ते प्रत्येकाने केले पाहिजे असा माझा आग्रह आहे. पर्सनल ब्रॅण्डिंग यशस्वी पद्धतीने केल्यास तुमच्या जीवन समृद्धीचे ते एक माध्यम होते हा माझा अनुभव आहे. माझे होऊ शकते तर तुमचे किंवा इतर कुणाचे का नाही होऊ शकणार? 🙂

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *