Google My Business चे माझ्यावर सगळ्यात जास्त उपकार आहेत नव्हे तर मला बिझनेस मध्ये उभे करायला आणि यशस्वी व्हायला गूगल माय बिझनेस चा सिंहाचा वाटा आहे.
लोकल SEO काय आहे ?
जेंव्हा युझर्स ला विशिष्ट लोकेशन मधील विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल ची माहिती पाहिजे असते – जसे की रेस्टॉरंटS बद्दल किंवा hotels बद्दल किंवा एखाद्या ऑफिस बद्दल – तर अशी माहिती मिळवण्यासाठी युझर्स गूगल वर सर्च करतात. त्या वेळेला गूगल युझर्सला गूगल माय बिझनेस (GMB) च्या लिस्टिंग्स सादर करते – म्हणजेच रिझल्ट्स दाखवते. यालाच लोकल SEO किंवा लोकल SEO चे रिझल्ट्स असे म्हणतात. युझर्स त्यावर क्लिक करतात. पर्यायाने त्या वेबसाईट्स आणि बिझनेसेस ला त्याचा फायदा होतो.
उदाहरणार्थ : (१) तुमचे रेस्टोरेंट आहे. (२) तुमच्या रेस्टोरेंट च्या आसपास च्या लोकेशन मध्ये असलेले युझर्स गूगल वर “Best Restaurant Near Me” असे सर्च करतात. (३) अशा वेळेस गूगल तुमचे रेस्टोरेंट चे गुगल माय बिझनेस (GMB) चे रिझल्ट्स त्या युझर्स च्या मोबाईल वर टॉप वर दाखवते. (4) युझर्स तुमच्या रेस्टोरेंट चा मॅप बघून तुमच्या रेस्टोरेंट मध्ये येतात आणि तुम्हाला बिझिनेस मिळतो. (5) या उदाहरणा मध्ये रेस्टारेंट असल्या कारणाने युझर्स वॉक-इन होत आहेत, पण इतर प्रकारच्या बिझनेसेस साठी युझर कडून (लीड) कॉल्स किंवा वेबसाईट व्हिसिटस तुम्हाला गुगल माय बिझनेस (GMB) च्या माध्यमातून खूप सहज मिळविता येतात.
गुगल माय बिझनेस (GMB) हे फक्त “xxx xxxx Near Me” असल्या एका किफ्रेज साठी कामात येते असे नाही तर असे शकडो कीवर्ड आणि किफ्रेज आहेत (Near Me वगळून) ज्या करिता गुगल तुमचा GMB युझर्स ला दाखवू शकते आणि त्याचा निरंतर फायदा तुम्हाला होऊ शकतो.
गूगलमधे तुमच्या बिझनेस ला सगळ्यात top वर दाखवण्यासाठी बऱ्याच टेक्निक्स चा वापर केला जातो. लोकल SEO हे लोकल बिझनेस साठी योग्य आहे.
लोकल SEO चे फॅक्टर्स :
खालील फॅक्टर्स लोकल SEO साठी महत्वाचे आहेत :
- युझर ची लोकेशन : सर्च करणाऱ्या व्यक्ति चे लोकेशन काय आहे, त्यानी कोणत्या लोकेशन वरून सर्च केलं आहे ही गोष्ट लोकल SEO मधे खूप जास्त महत्वाची आहे.
- बिझनेस चे लोकेशन : तुमच्या बिझनेस चे लोकेशन (मॅप) तुम्ही गुगल माय बिझिनेस (GMB) वर अगदी बरोबर टाकणे हे सर्वात महत्वाचे आहे. युझर्स ला जर का त्या ठिकाणी तुमचे ऑफिस दिसले नाही व तसे त्यांनी गुगल ला कळवले , तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या SEO होण्याची शक्यता असते.
- किवर्ड चा वापर : वेबसाईट मध्ये लोकल किवर्डस जसे कि, “In Nagpur, In Pune, In Hadapsar” अशा सारख्या किवर्डस चा वापर करणे गरजेचे आहे.
- कॅटेगरी ची बरोबर निवड : गूगल माय बिझनेस मध्ये तुमच्या बिझनेस ला संयुक्तिक असणारी कॅटेगरी ची निवड करा. असं केल्याने लोकल SEO मधे खूप सुधार येतात.
- रेटिंग आणि reviews : तुमच्या बिझनेस ला गूगल माय बिझनेस मध्ये चांगले रेटिंग आणि reviews मिळाल्यास टॉप मधे रँक करण्याचे खूप चान्सेस आहेत. ग्राहकांना विनंती केल्यास त्यातले काही ग्राहक review टाकतात म्हणून आपल्या ग्राहकांना विनंती करत राहणे सुद्धा गरजेचे आहे, नव्हे तो सुद्धा आपल्या नित्याचा एक भाग असणे गरजेचे आहे 🙂.
लोकल SEO करणे का गरजेचे आहे ?
एखादी वेबसाइट आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळी वर सर्च इंजिन च्या सर्व युझर्स ला काही ठराविक कि-फ्रेज साठी गूगल वर सामान्यतः वर दिसू शकते. लोकल SEO चे गणित मात्र खूप वेगळे आहे.
वर उल्लेख केल्या प्रमाणे, तुमच्या वेबसाईट ला लोकल SEO साठी optimize करणे म्हणजेच एखादया लोकेशन च्या युझर्स ला दाखवण्यासाठी optimize करणे.
थोडक्यात तुमचा बिझनेस त्या लोकेशन मधे जास्तीत जास्त युझर्स पर्यंत पोहोचेल आणि ते युझर्स तुम्हाला कॉल करतील किंवा तुमच्या बिझनेस (ऑफिस / दुकान) पर्यंत सहज पोहोचू शकतील (वॉक-इन) अशी व्यवस्था करणे. म्हणून, तुम्हाला तुमचा बिझनेस एखाद्या शहरात / लोकेशन मध्ये विनामूल्य व सातत्याने प्रोमोट करायचा असेल तर लोकल SEO करणे गरजेचे आहे.
खालील ५ सोप्या टिप्स उपयोगात आणल्यास, त्यापुढील ३० दिवसात तुमचा लोकल बिझनेस वाढायला नक्की सुरवात होईल…
टिप १. तुमच्या बिझनेस ला गूगल माय बिझनेस वर रजिस्टर करा, त्यातील १००% माहिती भरा, नियमित अपडेट करा – रोज किमान एक पोस्ट टाका.
तुमच्या बिझनेस ला ऑनलाइन घेऊन जाण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा बिझनेस, गूगल माय बिझनेस वर लिस्ट करणे गरजेचे आहे म्हणजे गूगल तुमच्या एरिया मधील लोकांना तुमचा बिझनेस दाखवु शकेल.
तुमच्या बिझनेस संबंधित म्हणजेच प्रॉडक्ट्स, सर्विसेस, ऑफिस / दुकान इत्यादी चे सर्व फोटोग्राफ्स अपडेट करा.
लक्षात असुद्या, रोज किमान एक पोस्ट टाकणे आवश्यक आहे.
टिप २. गुगल माय बिझनेस मध्ये लिस्ट केलेल्या तुमच्या बिझिनेस च्या नावात तुमचा मुख्य किफ्रेज टाका :
तुमच्या बिझनेस संबंधित मुख्य किफ्रेज ज्याने तुमचा बिझनेस युझर्स सर्च करतात – तुमच्या नावात गुगल माय बिझनेस मध्ये लिस्ट केलेल्या तुमच्या बिझनेस च्या नावात असणे खूप गरजेचे आहे. असे केल्याने गुगल तुमच्या किफ्रेज साठी तुमचा बिझनेस recognized करते.
- उदाहणार्थ: नागपुरात असेलेल्या माझ्या डिजिटल मार्केटिंग इन्स्टिटयूट चे नाव “NetPreneur Digital Marketing Training Institute” असे आहे.
- Digital Marketing Training Institute साठी मुख्य किफ्रेज (ज्यावर सगळ्यात जास्त सर्चेस येतात) “Digital Marketing Course(s)”, “Digital Marketing Classes(s)” अशा आहेत.
- NetPreneur ला Google My Business वर लिस्ट करतांना मी NetPreneur Digital Marketing Training Institute असे न करता NetPreneur Institute Of Digital Marketing Courses & Classes, Nagpur असा केला आहे.
टिप ३. बिझनेस चे नाव, ऍड्रेस व फोन (मोबाईल) नंबर (NAP ) यात GMB सकट सर्व ठिकाणी सातत्य ठेवा :
Google My Business मध्ये तुमच्या बिझनेस चे नाव, ऍड्रेस व फोन (मोबाईल) नंबर यालाच NAP (Name, Address & Phone Number) असे म्हणतात, हे अगदी बरोबर असणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर हे GMB मधील NAP हेच तुमच्या वेबसाईट वर किंवा इतर लिस्टिंग मध्ये “तंतोतंत” देणे गरजेचे आहे. असे झाले तरच गुगल तुमच्या लिस्टिंग ची दाखल घेते व SEO मध्ये त्याचा होतो.
टिप ४. चांगले रेटिंग्ज आणि reviews मिळवा व त्या reviews ला रेस्पॉन्ड सुद्धा करा:
ज्या बिझनेस चे रेटिंग्ज आणि reviews चांगले असतात अश्या बिझनेस ला गूगल पहिले शो करतो. म्हणून तुमच्या सर्विसेस चांगल्या असू द्या म्हणजे लोकं तुमच्या बिझनेस ला चांगल्या रेटिंग्ज आणि reviews देतील. शिवाय, वर उल्लेख केल्या प्रमाणे, ग्राहकांना विनंती केल्यास त्यातले काही ग्राहक review टाकतात म्हणून आपल्या ग्राहकांना विनंती करत राहणे सुद्धा गरजेचे आहे, नव्हे तो सुद्धा आपल्या नित्याचा एक भाग असणे गरजेचे आहे 🙂
ग्राहकांच्या Reviews ला Respond करणे पण तेवढेच गरजेचे आहे, नव्हे तर ते गुगलला अपेक्षितच असते.
टिप ५. तुमच्या बिझनेस ची वेबसाईट तयार करून त्या वेबसाईट चे होम-पेज optimized करा :
तुमच्या बिझनेस साठी तुम्ही वेबसाईट तयार करा. असे केल्याने तुम्ही युझर्स ला तुमच्या बिझनेस बद्दल माहिती सांगू शकता व युझर्स तुमच्या shop/outlet/ ऑफिस पर्यंत पोहोचू शकतील.
गुगल माय बिझनेस वर तुमची किंवा तुमच्या बिझनेस ची विनामूल्य वेबसाईट तयार होऊ शकते ज्याचा फायदा तुम्हाला SEO साठी होऊ शकतो.
अर्थात, तुमची स्वतः ची वेबसाईट अगोदरच असेल किंवा तुम्ही ती डेव्हलप करून घेणार असाल तर मात्र गुगल माय बिझिनेस वर दुसरी वेबसाईट करण्याची गरज नाही. गुगल माय बिझिनेस वर वेबसाईट च्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वेबसाईट चे नाव (डोमेन लिंक) टाकणे गरजेचे आहे.
तुमच्या वेबसाईट चे होमपेज optimize करा :
तुमच्या वेबसाईट च्या होमपेज वर तुम्ही कोण आहात, तुमचा बिझिनेस काय आहे, तुमचे लोकेशन काय इत्यादी स्पष्ट करा. गूगल वर तुमच्या बिझनेस चे हे घटक युझर्स ला सहज पणे समजायला सोपे करा.
वेबसाईट मधे किवर्डस चा वापर करा :
तुमच्या वेबसाईट मधे तुमच्या बिझनेस शी रिलेटेड करेक्ट किवर्ड चा वापर करा म्हणजे गूगल लोकांना तुमची वेबसाईट दाखवु शकेल आणि बरेच लोकं तुमच्या बिझनेस पर्यंत पोहोचू शकतील.
उदाहरणार्थ : बेस्ट डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन नागपूर , बेस्ट रेस्टॉरंटS ई.
लोकल SEO चे फायदे :
लोकल SEO चे तसे बरेच फायदे आहे, पण सगळ्यात महत्वपूर्ण फायदे जे एखादया बिझनेस ला लोकल SEO केल्याने होतात ते खालील प्रमाणे आहेत :
- लोकल SEO केल्याने तुमचा बिझनेस एक खास एरिया मधे फ्री ऑफ कॉस्ट खूप लोकांन पर्यंत पोहोचून जातो.
- लोकल SEO केल्याने लोकांना तुमच्या बिझनेस बद्दल माहिती मिळते आणि फ्री मधे तुमच्या बिझनेस ची मार्केटिंग पण होऊन जाते.
- जे लोकं तुमच्या बिझनेस ला शोधत असतात, लोकल SEO केल्याने त्यांना तुमच्या बिझनेस बद्दल सहज माहिती मिळून जाते.
माझा निष्कर्ष :
मला स्वतःला NetPreneur Digital Marketing Institute साठी अनेक organic लीड्स गुगल माय बिझनेस मुळे मिळाल्यात.
मला आशा आहे की, तुम्ही लोकल SEO साठी तुमची वेबसाईट कशी optimize करायची याच्या टिप्स समजले असाल. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया खाली आपल्या टिप्पण्या द्या.