AbhaySonak.Com काय काम करते?

खालील २ कारणांसाठी या AbhaySonak.Com या प्लॅटफॉर्म चा जन्म झाला :

१. डिजिटल मार्केटिंग या विषया बद्दल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकां (MSME) च्या मनात असेलेला गोंधळ. या गोंधळाचे २ कारणं आहेत –

(A) मार्केट मध्ये असलेले बहुतेक डिजिटल मार्केटर्स किंवा मार्केटिंग सर्विसेस कंपन्याचे कमिटमेंट्स. कमिटमेंट्स केल्या नंतर मार्केटर्स करीत असेलेले कामे व त्यातून उद्योजकांना मिळणारे रिझल्ट्स या सर्वां मध्ये तफावत आहे. यातून उद्योजकांना तोटा सहन करावा लागलेला आहे, त्यांचा वेळ वाया गेला आहे पर्यायाने मार्केट मध्ये असलेल्या इतर डिजिटल मार्केटर्स व सर्विसेस कंपन्या वरचा उद्योजकांचा विश्वास कमी झालेला आहे.

(B) दुसरे कारण – वरील अनुभव आल्यावर काही उद्योजक स्वतः शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतात, पण डिजिटल मार्केटिंग शिक्षण क्षेत्रात सुद्धा तोच प्रकार आहे जो डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस मध्ये आहे. (a) बऱ्याच शिक्षण संस्था (institutes) ज्या कोडिंग शिकवतात उदाहरणार्थ HTML, CSS, JAVA, PHP त्याच डिजिटल मार्केटिंग सुद्धा शिकवतात. वास्तविक पाहता कोडिंग चा आणि डिजिटल मार्केटिंग चा काहीही संबंध नाही, दोन्ही वेगळे विषय आहेत. (b ) डिजिटल मार्केटिंग चा एखादा कोर्स करून किंवा युट्युब वरचे व्हिडिओ पाहून डिजिटल मार्केटिंग शिक्षणाच्या क्षेत्रात उतरणारे अनेक आहे. अशा सगळ्या मंडळी कडून शिक्षण घेतले तर त्यातून अनुभवातून आलेली विद्या कमी तर फक्त पुस्तकी ज्ञान जास्त मिळते आणि ते स्वतः च्या बिझनेस वाढवण्यासाठी फार कामी नाही.

AbhaySonak.Com या प्लॅटफॉर्म ला डिजिटल मार्केटिंग विषया मध्ये गोंधळलेल्या या सूक्ष्म, लघु व  मध्यम उद्योजकांना  (MSME) डिजिटल मार्केटिंग चे सर्वांगीण (holistic) ज्ञान देऊन, योग्य मार्गदर्शना द्वारे ते हसत खेळत आचरणात (ACTION मध्ये) आणायला लावायचे आहे. पर्यायाने त्यांचा उद्योग वृद्धिंगत होत राहण्याची प्रणाली (system ) प्रस्थापित करायची आहे व त्यांना समृद्ध करायचे आहे. 

कारण २ – पर्सनल ब्रॅण्डिंग ची वापरात येत नसलेली पॉवर

(A ) कॉर्पोरट कंपन्या मध्ये अनेक वर्षे काम करणारी मंडळी आहेत ज्यांना त्यांच्या कामाचा चांगला अनुभव असतो. (B) दुसरी कडे अशी मंडळी पण आहेत कि स्वतः च्या बीझिनेस किंवा नोकरी व्यतिरिक्त दुसऱ्याच एका क्षेत्रात त्यांची आवड व expertise असते… हि मंडळी त्यांच्या या दुसऱ्या कामाच्या क्षेत्रात master असतात (C) सध्या कुठलेच काम करत नाही अशी काही मंडळी आहे, त्यांना काम करायचे असते, एखादे त्यांच्या आवडीचे असते व त्या क्षेत्रात काम करून अर्थार्जन (इनकम) करू शकतो असा त्यांचा विश्वास असतो…

वरील (A), (B) आणि (C) तिन्ही विभागात मोडणाऱ्यां मंडळींनी डिजिटल मार्केटिंग शिकून पर्सनल ब्रॅण्डिंग केल्यास पैश्या सोबतच जास्त इभ्रत सुद्धा कमावू शकतील, ते आनंदी आयुष्य जगातील.

जॉब करणाऱ्या मंडळी साठी किंवा प्रोफेशनल्स साठी एक मॅसेज – जगाला तुमच्या कौशल्याची (skill-set) व तुम्हाला जगाची गरज आहे… पर्सनल ब्रॅण्डिंग हि काळाची गरज आहे, त्याने तुम्ही स्वतः चे भले करताच पण पर्यायाने जगाचे सुद्धा भले करत असता..

तुम्हाला तुमच्या पेर्सोनल डिजिटल मार्केटिंग चे सर्वांगीण (holistic ) ज्ञान देऊन ते हसत खेळत आचरणात (ACTION ) आणायला लावायचे आहे. पर्यायाने त्यांचा उद्योग वृद्धिंगत होत राहण्याची प्रणाली (system ) प्रस्थापित करायची आहे व त्यांना समृद्ध करायचे आहे. 

एक गोष्ट माझ्या साठी खूप महत्वाची आहे – पैश्याला लक्ष्मी आणि धन असेही म्हणतात. येणाऱ्या ज्या पैश्या सोबत आशीर्वाद सुद्धा मिळतो ती लक्ष्मी. मला तुम्हाला समृद्ध करून तुमचे आशीर्वाद मिळवायचे आहेत.

मराठीच का? – ३ कारणे.

पहिले कारण – मराठीवर भाषेवर माझे निस्सीम प्रेम आहे. या एका गोष्टी साठी “संकुचित किंवा संकिर्ण विचारसरणी ” सारखे अनेक विशेषणं मला मराठी भाषिकां तर्फेच लावल्या जातात आणि त्या बद्दल मला कुठलाही आक्षेप नाही. हिंदी व इंग्रजी भाषा सुद्धा मला आवडतात व दोघां वरही माझे प्रभुत्व आहे.

दुसरे कारण – इंग्रजी आणि हिंदी भाषे मध्ये शेकडो मंडळी डिजिटल मार्केटिंग बद्दल चे ज्ञान अगोदरच देत आहेत किंवा तसे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. मराठी मध्ये मात्र डिजिटल मार्केटिंग मधल्या सर्व विभागांचे चे ज्ञान देणारे प्रोफेशनल प्लॅटफॉर्म मला आतापर्यंत दिसले नाही. एखाद्या व्यक्तीने संपूर्णतः झोकून मराठीत डिजिटल मार्केटिंग चे ज्ञान देण्याचे काम केलेले दिसत नाही. स्वतः चा व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून पार्ट-टाइम डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलणारे मराठी युट्युबर अनेक आहेत . पण प्रोफेशनल व्यक्ती मला दिसली नाही. थोडक्यात हि खूप मोठी स्पेस मला occupy करायची आहे.

तिसरे कारण – गेली १० वर्षे मी डिजिटल मार्केटिंग च्या क्षेत्रात काम करतो आहे. त्यातहि गेली चार वर्षे नागपुरात डिजिटल मार्केटिंग शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असेलेल्या नागपूर शहरात बहुतांश खाजगी शाळा व कॉलेजेस मध्ये शिकविण्याची व बोली भाषा हिंदी आहे. डिजिटल मार्केटिंग शिकवतांना लघु-मध्यम उद्योजक आणि जॉब करणाऱ्या विद्यार्थी वर्गाशी संबंध आला. माझ्या विद्यार्थ्यां मध्ये मराठी टक्का जास्त असल्याने व मराठी भाषा आवडत असल्याने माझे शिकवणे हे बऱ्याच अंशी मराठीत असायचे. या एका गोष्टीने मराठीच काय पण अमराठी विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्याबद्दल आपलूकी निर्माण झाली व त्या नात्याचे एक वेगळे रसायन तयार झाले. माझे सेशन्स मराठी- अमराठी विद्यार्थ्यांना हमखास connect होतात. आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. हाच आनंद मला द्विगुणित करायचा आहे म्हणूनच ऑनलाईन व्हिडिओ कोचिंग करतांना मी मराठी भाषाच निवडली.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *