माझे आयुष्य ज्यांनी यशस्वी आणि समृद्ध केले, ते “स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स” Earl Nightingale यांनी १९५६ मधे लिहिले व रेकॉर्ड केलेत. कुठल्याही जाती-धर्माच्या प्रसारा शिवाय, कुठल्या हि कंपनी वा व्यक्ती च्या ब्रॅण्डिंग शिवाय – स्वच्छ मनाने, केवळ लोकांचे भले करण्याच्या उद्देशाने तयार केलेला इतका सुंदर संदेश, मी माझ्या ५३ वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला- आणि मी अत्यंत प्रभावित झालो.
गेले कित्येक महिने जवळपास ४० मिनिटांचे हे रेकॉर्डिंग मी दररोज ऐकतो आहे, व त्यातील संदेश आचरणात आणतो आहे. माझ्यात आमूलाग्र बदल झालेला आहे, माझे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे.
तुम्ही सुद्धा हा संदेश सातत्याने वाचलात वा ऐकलात – व त्याला समजून घेऊन तुमच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणलात तर तुमचे जीवन लवकरच समृद्ध होईल अशी मला १००% खात्री आहे आणि त्याच एकमेव उद्देशाने मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
“स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स” चे मराठीत भाषांतर करण्याचे प्रथम सौभाग्य मला प्राप्त झाले याचा मला अत्यंत आनंद आहे. खाली निळ्या बॅकग्राऊंड मध्ये highlight केलेला भाग म्हणजे Earl यांच्या पत्नी, Diana Nightingale यांनी सुरवातीला प्रस्तावना केलेली आहे, ती सुद्धा लक्षपूर्वक ऐका जरूर वाचा जेणे करून या संदेशा मागचा, Earl यांचा दृष्टिकोन तुम्हाला कळेल व त्यातून नेमका बोध घेताना तुम्हाला सोपे होईल.
Disclaimer: Earl Nightingale यांच्या “स्ट्रेंजस्ट सिक्रेट्स” चे मराठीत अचूक भाषांतर करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.असे असले तरीही यात अनावधानाने काही चुका झाल्या असू शकतात. मी या भाषांतराच्या पूर्णतेबद्दल, विश्वसनीयतेबद्दल आणि अचूकतेबद्दल कुठलीही हमी देत नाही. या संबंधित Earl Nightingale यांचा इंग्रजी भाषेतील मूळ संदेश व त्याचे रेकॉर्डिंग, इंटरनेट व युट्युब च्या माध्यमातून उपलब्ध आहेत . या मराठी भाषांतरा मध्ये कुठल्याही प्रकारची शंका-आशंका असल्यास त्याचे निरसन Earl Nightingale यांचे इंग्रजी भाषेतील मूळ संदेश वाचून किंवा रेकॉर्डिंग ऐकून करता येऊ शकेल.
Earl Nightingale यांच्या “स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स” या संदेशा बद्दल Diana Nightingale यांचा संदेश पुढील प्रमाणे –
आता तुम्ही जो संदेश ऐकणार आहात, तो Earl Nightingale यांनी १९५६ मधे लिहिला आणि रेकॉर्ड केला. प्रत्यक्षात हा संदेश एका अशा प्रश्नाचं उत्तर आहे, जे ते वयाच्या ९ व्या वर्षा पासूनच सतत शोधत होते. Earl Nightingale यांचा जन्म आर्थिक मंदीच्या काळात झाला. ते खूप गरीब असल्या कारणाने लहानपणापासून त्यांच्या मनात एकच प्रश्न उदभवत असायचा कि, का काही लोकांचा जन्म समृद्धी आणि भरभराटी मध्ये जगण्यासाठी होतो तर इतर लोकांना, त्याच्या कुटुंबासारखेच, जगण्यासाठी आयुष्यभर सतत आटापिटा करावा लागतो? जेष्ठ मंडळींकडून त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, म्हणून त्यांनी मिळेल ते वाचायला सुरुवात केली जेणे करून त्यातून या प्रश्नांचं उत्तर मिळेल.
बराच काळ लोटला आणि Earl जेव्हा ३५ वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी हा संदेश लिहिला आणि रेकॉर्ड केला. एका शनिवारच्या सकाळी त्यांच्या अनुपस्थितीत, सेल्समन च्या एका छोट्या ग्रुपला त्यांचा रेकॉर्डेड संदेश ऐकवल्या गेला. जेव्हा Earl परत आलेत, त्यांना लक्षात आलं कि त्यांच्या या संदेशाचा त्या लोकांवर इतका सकारात्मक परिणाम झाला आहे, कि त्या लोकांना त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी, त्या रेकॉर्डिंग ची कॉपी पाहिजे आहे.
इतक्या मोठ्या मागणीला पूर्ण करण्यासाठी Earl यांनी कोलंबिया रेकॉर्ड ला संपर्क केला व स्वतः च्या रेकॉर्ड च्या copies मागवल्यात. Earl यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला, कारण कुठल्याही मार्केटिंग किंवा जाहिराती शिवाय, अगदी थोड्याच काळात त्या संदेशाच्या १० लाख copies विकल्या गेल्यात. Earl ला सुवर्ण रेकॉर्ड मिळाला.
Earl यांनी त्यांच्या या संदेशाला “सर्वाधिक आशचर्यजनक रहस्य” असे नाव दिले . आणि हे एक रेकॉर्डिंग, एक छोट्याश्या रोपट्या सारखे होते, ज्यावर एक पर्सनल डेव्हलपमेंट चा सर्वसमावेशक उद्योग प्रस्थापित झाला व वाढत गेला. Earl यांनी “सर्वाधिक आशचर्यजनक रहस्याचा” खरा अर्थ शोधून काढला होता – ज्यामुळे एखाद्याच्या जीवनातल्या उपलब्धी ठरविणे शक्य होत होते – ते स्वतः सुद्धा त्यांच्या गरिब परिस्तिथीतून वर आले आणि घरोघरी ओळखल्या जाऊ लागले. दूर दूरच्या देशात त्यांची प्रसिद्धी पसरली. त्यांचा दैनिक रेडिओ कार्य्रक्रम “Our Changing World” जगातला सगळ्यात मोठा प्रायोजित रेडिओ कार्य्रक्रम ठरला, ज्याला देश विदेशात लोकं ऐकायला लागलेत .
मी Diana Nightingale आहे. १९८९ ला माझ्या पती च्या निधनानंतर, माझा सतत प्रयत्न असतो कि जगाला प्रेरणा देणारे आणि रोमांचित करणारे Earl चे वेग-वेगळे संदेश, नवं-नवीन प्रभावी पद्धतीने कानाकोपऱ्यात पोहोचवले पाहिजे. आज पर्सनल डेव्हलपमेंट उद्योग खूप विकसित झाला आहे. परंतु आज सुद्धा जगभर “सर्वाधिक आशचर्यजनक रहस्याला” लोकं एक असा संदेश मानतात ज्याने त्यांच्या जीवनाला सर्वाधिक प्रभावित केलं. Earl ने आयुष्याच्या गेल्या ३२ वर्षात “सर्वाधिक आशचर्यजनक रहस्या” मध्ये बदलत्या काळा नुसार बरेच सुधार केलेत. या सुधारांमुळे आणि यांच्या शिवाय सुद्धा, माझा विश्वास आहे कि तुम्ही या मूळ रेकॉर्डिंग चे ऐतिहासिक महत्वाचे कौतुक कराल. ऐकत असतांना तुम्हाला जाणवेल कि हा संदेश आज सुद्धा तितकाच बरोबर, तितकाच मौल्यवान आणि तितकाच महत्वपूर्ण आहे जितका तो त्या काळी होता. तर आता मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करते कि तुम्ही सगळे आरामात बसून Earl Nightingale च्या या मूळ रेकॉर्डिंग “सर्वाधिक आशचर्यजनक रहस्याचा” आनंद घ्या.
द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स – By Earl Nightingale
(इंग्रजी भाषेतील मूळ संदेश वाचण्या करीत इथे क्लिक करू शकता)
रेकॉर्डिंग ऐकण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा:
या जगातले सर्वात आश्चर्यजनक रहस्य काय आहे हे मला तुम्हाला सांगायचे आहे.
एवढ्यातलीच घटना आहे, कि महान चिकित्सक आणि नोबेल पुरस्कार विजेता Dr. Albert Schweitzer यांना लंडनमध्ये एका मुलाखती दरम्यान एका पत्रकाराने विचारले की “डॉक्टर, आज माणसा सोबत काय चुकीचे होते आहे ?”. ते महान डॉक्टर एक क्षण शांत राहिलेत आणि मग म्हणालेत “हेच – की माणूस विचार करत नाही”. आणि आज मलाही तुमच्याशी याच विषयावर बोलायचं आहे.
आज आपण एका सुवर्ण युगात राहतो आहे. हे असे युग आहे ज्यासाठी मानव हजारो वर्षां पासून स्वप्न पाहत होता आणि मेहनत करत होता. पण आज हा सुवर्णकाळ जेंव्हा आम्हाला प्राप्त झाला आहे, तर आम्ही त्याला गृहीत धरले आहे, जसे काही गिफ्ट मिळाल्यासारखे. आणि हा सुवर्णकाळ मिळविण्यासाठी झालेल्या संघर्षाला आणि मेहनतीला आपण विसरलो आहोत.
पण यामुळे होतं काय तुम्हाला माहिती आहे? – चला आपण अशा १०० लोकांबद्दल विचार करूया ज्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी स्वतः च्या करिअरची सुरुवात केली. काय वाटत तुम्हाला? वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांच्या करिअर चे काय होईल? २५ व्या वर्षी जेंव्हा त्यांनी करिअर ला सुरवात केली, तेंव्हा त्यां सर्वांना विश्वास होता कि ते यशस्वी होतील. यापैकी तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारले की “तुला यशस्वी व्हायचे आहे का?” तर तो म्हणेल “नक्कीच”. आणि तुम्हाला लक्षात येईलच , की त्याच्या डोळ्यात जीवना बद्दल एक उत्सुकता, एक जिज्ञासा आहे. त्याच्या डोळ्यात एक चमक आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचे determination स्पष्ट पणे दिसत आहे. आणि जीवन त्या व्यक्ती समोर एका सुंदर adventure सारखे आहे. पण हे सर्वजण जेंव्हा वयाची पासष्टी (६५) गाठतील तेंव्हा काय होईल माहिती आहे? – त्यांच्या वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांच्यापैकी एक श्रीमंत झाला असेल, चार जण financially independent झाले असतील पण या वयात सुद्धा काम करत असतील, आणि बाकी ९५ खचले असतील.. आता थोडा विचार करा – १०० जणांपैकी फक्त पाचच जण एक स्तर गाठू शकलेत. उर्वरित इतके जास्त fail का ठरलेत? २५ वर्षाचे असतांना त्यांच्या डोळ्यात असलेली ती चमक आणि चेहऱ्यावरचे determination – त्याचे काय झाले? ते स्वप्न, त्या योजना, त्या आशा – त्या सर्वांचे काय झाले?
माणसाला जे करायचं असतं आणि तो जे करू शकतो त्या मध्ये एवढे मोठे अंतर का आहे?
जर आम्ही असे म्हणतो कि फक्त ५% लोकांनीच यश प्राप्त केले – तर आम्हाला यश म्हणजे काय हे ही स्पष्ट करावं लागेल आणि हि आहे यशा ची definition:
यश म्हणजे एका महान ध्येया ला स्पष्टपणे ठरवून त्या दिशेने पुढे जाणे.
एक माणूस जर अगोदर ठरवलेले ध्येय प्राप्त करण्याच्या च्या दिशेनेच्या काम करत आहे, व त्याला माहिती आहे की तो कुठे जातो आहे आणि त्याला कुठे जायचं आहे तर तो माणूस यशस्वी आहे. जर तो असे करत नाहीये तर तो अयशस्वी आहे.
थोडक्यात, यश म्हणजे ठरवलेल्या ध्येयाला समोर ठेवून त्या दिशेने पुढे जाणे!
महान मनोवैज्ञानिक Rollo May ने एक अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. माणसाचा स्वतः चा शोध (Man’s Search for Himself) या पुस्तकात ते म्हणतात – आपल्या समाजात, साहस आणि प्रोत्साहन याविरुद्ध काही असेल तर ते भेकडपणा नसून ती “अनुरूपता” आहे. आज आपल्या समोर जे सगळ्यात मोठे आव्हान आहे ते आहे अनुरूपता. म्हणजेच कुठलाही विचार न करता, गर्दी सोबत राहण्याची मनस्थिती. म्हणजेच बहुतेक लोकं तेच करत आहेत जे इतर करत आहेत. आणि “आपण असे का करत आहोत?” याचा ते विचारही करत नाहीत.
वयाच्या जवळपास सातव्या वर्षापासून आपण शिक्षणाला सुरुवात करतो. वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपण कमवायला सुरुवात करतो त्या बरोबरच कुटुंबाची जबाबदारी सुद्धा घेतो. पण ६५ वर्षाचे झाल्यावर सुद्धा आपण हे समजू शकत नाही, की financially आपण आत्मनिर्भर आणि निश्चिंत कसे होऊ. कारण फक्त एकच, की आपण इतर लोकांचे अनुकरण करतो. हेच आव्हान आहे की आपण त्या चुकीच्या आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या ९५% लोकांचे अनुकरण करत असतो जे यशस्वी होऊ शकले नाहीत.
आता प्रश्न असा आहे – की लोकं एवढ्या मोठ्या संख्येने इतरांचे अनुकरण का करतात? याचे उत्तर त्यांच्या जवळ सुद्धा नाही. या लोकांना असे वाटते की परिस्थितीने त्यांचे जीवन एका साच्यात घातले आहे. असे लोकं external factors ने प्रभावित होणारे लोक असतात.
एकदा काम करणाऱ्या फार मोठ्या संख्येच्या लोकांवर एक सर्वे केला गेला, त्यांना हे प्रश्न विचारले गेलेत – की तुम्ही काम का करता? सकाळी का उठता? २० पैकी १९ लोकांजवळ याचे कुठलेच उत्तर नव्हते. त्यांना विचारलं तर ते म्हणतील, सगळेच लोकं सकाळी उठून कामावर निघून जातात आणि म्हणूनच ते स्वतः सुद्धा तसेच करत आहेत.
आपण आता यशाच्या definition वर परत येऊ – यशस्वी कोण होतं? फक्त तीच व्यक्ती जी आपले ध्येय ठरवून त्या दिशेने पुढे जाते. अशी व्यक्ती म्हणते की मला जीवनात अमुक बनायचे आहे आणि त्या दिशेने कामाला सुरुवात करते. मी तुम्हाला सांगतो की यशस्वी लोकं कोण आहेत:
ती स्कूल टीचर यशस्वी आहे, जी मुलांना या करिता शिकवते आहे कारण तिला हेच काम करायचे होते. ती महिला आपल्या जीवनात यशस्वी आहे, जी एक पत्नी आणि आई आहे कारण तिला पत्नी आणि आईच व्हायचे होते. आणि ती आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार सुद्धा पाडते आहे. तो कोपऱ्यावरचा पेट्रोल पंप चालवणारा माणूस सुद्धा यशस्वी आहे कारण त्याने हेच काम करायचे ठरवले होते. तो सेल्समन यशस्वी आहे, ज्याला एक टॉप चा सेल्समन व्हायचे होते आणि त्याच उद्देशाने तो व्यवसाय करतो आहे.
ती प्रत्येक व्यक्ती सफल आहे जी सुरुवाती पासूनच स्वतःचे ठरवलेले काम, विचार पूर्वक करते आहे. कारण, हे तेच काम आहे, जे त्या व्यक्तीने पूर्ण विचारांती करण्याचे ठरवले होते.
पण २० पैकी फक्त १ व्यक्तीच असे करू शकते आणि इतर कुणाशीही, कुठल्याही प्रकारची प्रतिस्पर्धा करण्याऐवजी आपल्याला जे पाहिजे ते आपण create करायचे असते.
जवळपास २० वर्षां पासून मी त्या चावीचा शोध घेतो होतो, ज्यामुळे माणसाला सुरवाती पासूनच, त्याचे भविष्य त्याच्या मनासारखे ठरविता येईल. अशी चावी कुठे आहे का? मला सांगा अशी चावी, जी वापरल्याने भविष्या बद्दल सगळे काही ठरवता येऊ शकेल? आणि आपण अगोदरच त्या बद्दलची भविष्यवाणी करू शकू? –
आहे का अशी चावी? – जी माणसाला त्याच्या यशस्वी होण्याची गॅरेंटी देऊ शकेल?
– जर माणसाला अशी चावी मिळाली आणि ती त्याला वापरता आली तर किती छान होईल!
मी सांगू? अशी चावी आहे आणि मी ती मिळवली सुद्धा आहे!
तुम्हाला कधी आश्चर्य नाही वाटले का, कि जगात एवढे सगळे लोकं, खूप मेहनत आणि प्रामाणिक पणे काम करतात, पण त्यांना त्यांच्या आयुष्यात म्हणावे तसे यश प्राप्त होत नाही? – तर दुसरीकडे, काही लोकांना मेहनत न करताच खूप यश मिळते. म्हणजेच त्यांच्या जवळ काहीतरी जादू आहे. लोकं म्हणतात – “ती व्यक्ती अशी आहे कि ती ज्या गोष्टीला हात लावते त्या गोष्टीचे सोने होते.”.
तुम्हाला लक्षात आले का? – एखादी व्यक्ती, जी आयुष्यात यशस्वी झाली आहे, ती नेहमीच यशाच्या दिशेनेच प्रयत्नीशील असते. आणि दुसरीकडे एक अयशस्वी व्यक्ती, नेहमी अपयशाच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्नशील असते? असे फक्त ध्येया मुळे होते.
आपल्या पैकी काही जणांकडे ध्येय असतात व ते त्याच दिशेने काम करतात. या उलट काही लोकां जवळ कुठलेही ध्येय नसते. ध्येय बाळगणारे व्यक्ती सफल होतात, कारण त्यांना माहिती असते कि त्यांना कुठल्या दिशेने पुढे जायचे आहे.
आता एका अशा जहाजा बद्दल विचार करा जे port वरून निघणारच आहे – यात्रेची पुर्ण योजना आणि नकाशा सोबत घेऊन. जहाजाचे कॅप्टन आणि चालक ग्रुपच्या सदस्यांना हे व्यवस्थित माहिती आहे की त्यांना कुठे जायचे आहे आणि किती वेळ लागणार आहे. या जहाजा समोर एक स्पष्ट ध्येय आहे. स्पष्ट ध्येय आणि स्पष्ट मॅप ठेवणारे जहाज त्याच्या १०,००० ट्रिप्स पैकी ९ ,९९९ वेळा त्याच्या त्याच ध्येयावर पोहोचेल ज्यासाठी ते निघाले होते. म्हणजेच शंभर टक्के ध्येयावर.
अशाच प्रकारे, दुसऱ्या एका जहाजा चे उदाहरण घेऊया, फरक फक्त एवढाच आहे की या जहाजा वर कुणी कॅप्टन किंवा कुठलाही चालक सदस्य नाही. या जहाजा समोर कुठलेच ध्येय नाही आणि कसलाच उद्देश नाही. फक्त इंजिन स्टार्ट करून त्या जहाजाला सोडल्या जाते. मला वाटतं की माझ्या या मताशी तुम्ही सुद्धा सहमत असाल कि port वरून एकदा हे जहाज निघाल्या नंतर एक तर बुडेल किंवा वादळात सापडेल किंवा कुठल्यातरी निर्मनुष्य ireland वर जाऊन थांबेल. हे जहाज कुठे पोहचूच शकणार नाही कारण या जहाजा समोर कुठलेही ध्येय नाही व ना कुठले मार्गदर्शक.
अगदी हीच गोष्ट मनुष्याला सुद्धा लागू होते. एका सेल्समनचेच उदाहरण घ्या. आज जगात हुशार सेल्समन च्या व्यवसायापेक्षा चांगल्या यशाची अपेक्षा दुसऱ्या कुठल्याच व्यवसाया मध्ये नाही. जर आपले ध्येय स्पष्ट आहे, आणि आपल्या कामात आपण हुशार आहोत, तर सेलिंग प्रोफेशन म्हणजेच विक्रीचा व्यवसाय जगातला सगळ्यात जास्त मिळकत देणारा व्यवसाय आहे.
आज प्रत्येक कंपनीला हुशार सेल्समनची गरज आहे. आणि त्यासाठी त्या कंपन्या भरपूर पगार द्यायला तयार आहेत. असे सेल्समन करिअर मध्ये भरपूर प्रगती करण्याची शक्यता आहे. पण आपल्याला असे किती कुशल लोकं मिळतात?
कुणीतरी म्हटलेच आहे, की आज मानव जातीचे संपूर्ण लक्ष – सक्षम लोकांना फायदा घेण्यापासून रोखण्यात नाही, तर कमजोर लोकांचे नुकसान वाचवण्याकडे आहे. आज अर्थव्यवस्थेची तुलना, एक convoy म्हणजेच, एका जत्थाशी होऊ शकते. जत्था अशाच वेगाने पुढे जातो जेणे करून त्यातील सगळ्यात हळू चालणारी तुकडी सुद्धा त्या जत्थाची सोबत करू शकेल. त्याचप्रमाणे आज पूर्ण अर्थव्यवस्था, आपल्या सर्वात कमजोर श्रेणीला सेफगार्ड करण्यासाठी हळुवार चालते आहे. म्हणूनच आज उपजीविके कमावणे फार सोपे झाले आहे. आज उपजीविकेसाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी एखाद्या खास बुद्धीची किंवा प्रतिभेची सुद्धा गरज लागत नाही.
सहसा मनुष्यप्राणी उपजीविकेसाठी याच सुरक्षेच्या शोधात असतो आणि ही तथाकथित सुरक्षा आपल्याला उपलब्ध सुद्धा आहे. पण हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की सीमारेषेपेक्षा किती उंच ध्येय आपण स्वतः साठी ठरवू इच्छितो.
चला, आता आपण जगातल्या सगळ्यात आश्चर्यजनक रहस्याचे कडे, म्हणजेच जी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या गोष्टीकडे वळू. जीवनात स्पष्ट ध्येय असणारे लोकं का यशस्वी होतात? आणि ध्येय विहीन लोकं का अयशस्वी होतात? – चला, आता मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगतो, त्या तुम्ही समजून घेतल्यात, तर तुमच्या जीवनात खूप लवकर बदल घडेल.
जे काही मी तुम्हाला सांगतो आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, तर तुमचं जीवन आज जसे आहे तसे राहणार नाही. तुम्हाला बऱ्याच वर्षां पासून पाहिजे असलेले सौभाग्य तुम्हाला अचानक मिळेल. तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सगळं तुमच्या पुढे साकार होईल आणि तुम्ही त्या सगळ्या चिंता-समस्यां आणि परिस्थितीतून मुक्त व्हाल ज्यांनी तुम्हाला काही वर्षांपासून जखडून ठेवलेले आहे. शंका आणि भय भूतकाळातल्या गोष्टी होतील.
यश आणि अपयशाची ती चावी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते . मी पुन्हा सांगतो, आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. संपूर्ण इतिहासात जे महान बुद्धिमान लोक झालेले आहेत, मग ते शिक्षक असो, तत्वज्ञानी असो किंवा पैगंबर असो, त्यांच्या विचारात बऱ्याच मुद्द्यांबद्दल मतभेद असतील – पण या एका मुद्द्यावर मात्र त्यांची संपूर्ण सहमती आहे.
महान रोम सम्राट Marcus Aurelius म्हणतात – माणसाचे विचार जसे असतात तसेच त्याचे जीवन घडते.
Benjamin Disrael या बद्दल म्हणाले की माणसाची ईच्छा असेल व त्याने संयम ठेवला, तर प्रत्येक गोष्ट त्याला मिळू शकते.
खूप सखोल विचार केल्यावर मी या निर्णयावर पोहोचलो आहे, की एक निश्चित ध्येय असणारा मनुष्य कुठल्याही परिस्थितीत आपल्या ध्येयायाला पूर्ण करतो, आणि जर त्याची मजबूत इच्छाशक्ती असेल, तर त्याच्या मार्गात कुठलीच अडचण टिकत नाही.
Ralph Waldo Emerson यांचे म्हणणे आहे, की एक माणूस तसाच बनतो जसा तो पूर्ण दिवसभर विचार करतो.
William James म्हणतात – माझ्या पिढीचा सगळ्यात मोठा शोध हाच आहे, की माणसाने आपल्या विचारांच्या दृष्टिकोन बदलल्यास, तो स्वतः चे जीवन सुद्धा बदलू शकतो. पुढे ते असे ही म्हणतात की आवशक्यता फक्त या गोष्टीची आहे, की आपण आपल्या जीवनात, आपल्याला पाहिजे असेलेल्या गोष्टींना, त्या वास्तविक जीवनात जणू घडतच आहेत असा विचार केला पाहिजे. हळूहळू, या विचारांचा जीवनाशी असा संपर्क होईल, की जीवनात पाहिजे असेलेल्या गोष्टी, वस्तुस्थिती मध्ये येऊन, प्रत्यक्षात आपल्या विचारांशी, आपल्या सवयींशी व आपल्या भावनांशी अशाप्रकारे मिसळतील, की आपला विश्वास साकार होतो.
William James ने असेही म्हटलं आहे, की तुम्ही एखाद्या विशेष परिणामा बद्दल खूप जास्त विचार करता आहात, तर निश्चितपणे ते परिणाम तुम्ही प्राप्त करू शकता. जर तुमची श्रीमंत होण्याची इच्छा असेल, तर तुम्ही निश्चितपणे श्रीमंत व्हाल, जर तुम्हाला विद्वान होण्याची इच्छा असेल तर तुम्ही विद्वान व्हाल. त्याच प्रमाणे जर तुम्हाला भला माणूस व्हायचं असेल, तर तुम्ही भला माणूस व्हाल. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे कीआपल्या वस्तू विशेष किंवा ध्येयासाठी वास्तविक इच्छा शक्ती विकसित करायची आहे आणि त्या दरम्यान ते एकच ध्येय तुमच्या समोर असले पाहिजे. एकाच वेळी शेकडो वेगवेगळ्या गोष्टींवर तुमचे ध्यान भटकते आहे – असे व्हायला नको.
तुम्हाला बायबलचे ते कथन माहिती असेल, की जो विश्वास करतो, त्याच्यासाठी सगळे काही शक्य आहे.
Dr. Norman Vincent Peale ने म्हंटल आहे, की सृष्टी च्या सर्वात महान नियमांमध्ये हे एक आहे, जर का तुमचे विचार नकारात्मक असतील, तर नकारात्मक परिणामच तुमच्या समोर येतील. आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्ही जे करणार आहात त्याचा परिणाम सुद्धा सकारात्मकच असेल. ही एक साधारण वास्तविकता आहे, जी समृद्धी आणि यशाच्या या आश्चर्यजनक नियमाचा आधार आहे.
फक्त चार शब्दात सांगायचे झाले, तर विश्वास करा आणि यशस्वी व्हा.
William Shakespeare नी असे म्हटले आहे, की आमच्या शंका इतक्या विश्वासघातकी असतात कि आपण एखादा प्रयत्न करण्या चा नुसता विचार जरी केला तरी त्या आपल्याला भयभीत करतात. आणि आपण त्या सगळ्या घडामोडींवर पराजित होतो जिथे आपण जिंकू शकलो असतो.
George Bernard Shaw यांचं म्हणणं आहे की “लोकं त्यांच्या परिस्थितीसाठी नेहमी त्यांच्या circumstances ला दोष देतात. पण माझा circumstances विश्वास नाही. या जगात यश प्राप्त करणारे ते लोकं आहेत, ज्यांनी कामाची सुरुवात केली आणि स्वतः च्या मना सारखे circumstances स्वतः निर्माण केलेत.”
ही वास्तविकता किती सुखद आहे – हो ना? आणि ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनी यश प्राप्त केले आहे. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. म्हणूनच आपण एखाद्या ठोस आणि अर्थपूर्ण ध्येयाचा विचार केला, तर आपण ते नक्की प्राप्त सुद्धा करू शकतो.
दुसरीकडे ती व्यक्ती जिच्या पुढे कुठलेही ध्येय नाही, तिला कुठे जायचे आहे हे माहिती नाही आणि याच कारणामुळे ती संशय, भय, चिंता आणि त्रासाने घेरल्या गेली आहे, ती व्यक्ती तशीच होईल जशी ती विचार करते आहे. आणि जर का कि ती व्यक्ती कुठल्याही ही गोष्टीचा विचार करत नसेल, तर त्या व्यक्तीचे काहीही होऊ शकणार नाही.
या, आता आपण हे समजून घेऊ की हे सर्व कसे काम करते – का आपण तसेच घडतो जसा आपण विचार करतो – मी तुम्हाला सांगतो की हे सगळं का आणि कसं होतं. कल्पना करा, की शेतकऱ्या जवळ थोडी जमीन आहे. जमीन खूप चांगली आणि सुपीक आहे. जमिनीत काय पेरायला पाहिजे हा निर्णय पूर्णपणे शेतकऱ्याचा आहे. त्याला जे पेरायचे आहे ते तो पेरू शकतो – जमिनीला यात काहीही स्वारस्य नाही.
हे लक्षात घ्या, की माणसाचं मन सुद्धा जमिनी सारखेच आहे. खरेतर आम्ही मानवी मनाच्या तुलनेत जमिनीचे उदाहरण देतो आहे. जमिनी प्रमाणेच आपल्या मनाला सुद्धा या गोष्टीत काहीही स्वारस्य नाही, की आपण त्याच्यात कुठले विचार पेरत आहोत. फक्त जे काही यात पेरल्या जाईल, त्याचेच पिक ते आपल्याला परत देईल. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या बाबतीत हीच वास्तविकता लागू होते. जर आपण सकारात्मक विचार पेरलेत, तर यशाचे पीक मिळेल आणि नकारात्मक पेरणी केली तर अपयशच हाती येईल.
कल्पना करा की त्या शेतकऱ्याच्या हातात दोन प्रकारचे बियाणे आहेत. एक कुठल्यातरी धान्याचे आणि दुसरे कुठले तरी विषारी झाडाचे. शेतकरी जमिनीत दोन ठिकाणी दोन बियाणे पेरतो. तो त्या ठिकाणी पाणी देतो आणि त्यांची देखरेख करतो. आता जमीन त्या ठिकाणी जे काही पेरल्या गेले आहे तेच परत करते (पिक देते). दोन्ही झाडे उगवतात, एक धान्याचे आणि दुसरे विषारी. बायबलमध्ये म्हंटले सुद्धा आहे की “आपण जसे पेरतो तसेच कापतो ” (you reap as you sow) . लक्षात ठेवा, जमिनीला या गोष्टीत काहीही स्वारस्य नाही कि ती तुम्हाला धान्य देते आहे कि विष.
आता मानवी मन तर जमिनीपेक्षा जास्त विश्वासू आहे, खूप जास्त सुपीक आहे आणि खूप जास्त चमत्कारी आहे. पण हे जमिनीच्या सिध्दांतावरच काम करते. हे सुद्धा या गोष्टीची चिंता करत नाही, की आपण यात काय पेरतो आहे. फक्त जे काही पेरल्या जाईल, ते त्यालाच परत करते. मग ते यश असो की अपयश असो, एक निश्चित ध्येय असो, किंवा confusion. गैरसमज असो, भय असो किंवा चिंता असो – काहीही असो – जे काही आपण यात टाकू तेच आपल्याला ते परत करेल.
तुम्हाला माहिती आहे, की मानवी-मन आज या धर्तीवर एकच असा महाभाग आहे ज्याचे आज पर्यंत अन्वेषण झालेले नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा सुख-समृद्धी यात भरलेल्या आहेत. यात जर आपण सकारात्मक विचार टाकलेत तर ते आपल्याला भरपूर यश आणि समृद्धी परत देईल. तुम्ही म्हणू शकता, की “जर का हे खरं आहे तर लोकं आपल्या मनाचा जास्त वापर का करत नाहीत?”. लोकांजवळ याचंही उत्तर आहे. आपलं मन हे एका प्रगत रूपात आपल्याला जन्मापासूनच मिळालेलं आहे, निशुल्क आणि मोफत. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्यांना आपण फार कमी महत्त्व देतो. महत्व देतो त्या गोष्टींना, ज्या पैशाने मिळतात. वस्तुस्तिथी या उलट आहे. वास्तवीकपणे आज ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात महत्वाच्या आहेत, त्या आपल्यलाला निशुल्क उपलब्ध आहेत. आपलं मन, आपला आत्मा, आपले शरीर, आपल्या आशा, आपले स्वप्न, आपल्या आकांक्षा, आपली बुद्धी, कुटुंब, मुलं आणि मित्रांचे प्रेम. इतकेच काय, तर नैसर्गिक भेट – हवा, ऊन आणि पाऊस सुद्धा. या सगळ्या अनमोल गोष्टी आपल्याला निशुल्क मिळाल्या आहेत. आणि ज्या गोष्टींसाठी आपण पैसे मोजतो, त्या यांच्या तुलनेत फार हलक्या आहेत. स्तरहीन आणि त्यांना कुठल्याही गोष्टींनी बदलता येऊ शकते. पण निसर्गा कडून मिळत असलेल्या गोष्टी कधी बदलल्या जाऊ शकत नाही.
आणि दुसरी गोष्ट, कि मानवी मनाच्या शक्तीचा पुरेसा उपयोग झालेला नाही. मन एवढे शक्तिशाली आहे, की त्याला जे कुठले काम आपण देऊ – ते करू शकते. पण सहसा, आपण मोठे आणि महत्वाच्या कामा ऐवजी लहान -सहान कामा साठी याचा उपयोग करतो. बऱ्याच विश्वविद्यालयांने हे सिद्ध केले आहे की आपल्यापैकी बहुसंख्य लोकं आपल्या क्षमतेच्या फक्त १०% वापर करतात. आपली उर्वरित क्षमता वापरल्याच जात नाही. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचे आहे. तुमच्या ध्येयाचे – तुमच्या मन-रुपी जमिनीत पेरणी करा. हा तुमच्या जीवनाचा सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय आहे. तुम्ही एक खूप यशस्वी सेल्समन होऊ इच्छिता. कंपनीच्या कुशल आणि सक्रिय कर्मचाऱ्याच्या रूपात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ इच्छितात. तुम्हाला फक्त हेच करायचे आहे, कि या ध्येयरुपी बिजाचे रोपण तुमच्या मनात करायचं आहे. मनापासून एकाग्र होऊन याची काळजी घ्या. ध्येयाच्या दिशेने पुढे जा. कार्यशील रहा. आणि एक दिवस तुमचे स्वप्न वस्तुस्थिती मध्ये बदलेल – असे होईलच, कारण या शिवाय दुसरा मार्गच नाही!
लक्षात घ्या, हे निसर्गाच्या इतर नियमां प्रमाणेच एक नियम आहे – जसे Sir Isaac Newton चा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे – की जर तुम्ही एखाद्या इमारती वरून उडी मारलीत, तर तुम्ही खाली येणार, वर जाऊ शकणार नाही.
निसर्गाचे सगळे नियम नेहमी बरोबर असतात आणि नेहमी काम करतात. तुम्ही सुद्धा अगदी सकारात्मक दिशेने तुमच्या ध्येया बद्दल विचार करा. नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा की तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त केले आहे. ध्येय गाठल्यावर जी कामे तुम्हाला करायची आहेत त्या कामांचा विचार करा आणि स्वतः ते करत आहात असे ध्यानात आणा.
आज आपल्या युगाला “औषधांचे युग”, किंवा “अल्सर वा नर्वस ब्रेकडाऊन चे युग” असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. आज चिकित्सा विज्ञानाने स्वास्थ आणि दीर्घायुष्य मिळवण्याच्या दिशेने इतके यश मिळवलेले आहे, पण असे असूनही लोकं समस्यांशी दोन हात करताना तणावग्रस्त होतात आणि स्वतःला अल्पकाळातल्या मृत्यूकडे ढकलतात. असे होण्याचे कारण की ते महान नैसर्गिक नियमाला आपलेसे करणं शिकले नाहीत, जे आपल्याकरता अत्यंत प्रभावी व लाभदायी आहे. आपल्या विचार करण्याच्या व समजून घेण्याच्या पद्धती मध्येच हा चमत्कार आहे. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्ती तिच्या सर्व विचारांचेच फलस्वरूप असते. तिला ते स्वीकृत असो किंवा नसो, पण आज ती व्यक्ती जिथे आहे आणि ज्या स्थितीत आहे ते त्या व्यक्ती च्या विचारांचाच परिणाम आहे.
आपल्या पैकी प्रत्येकाला भविष्यात सुद्धा आपल्या आजच्या विचारांचेच फळ मिळणार आहे. म्हणजेच आज, उद्या, किंवा पुढच्या महिन्यात, किंवा पुढच्या वर्षात आपल्या विचारांची जी दिशा असेल त्यातूनच आपले भविष्य आणि आपले जीवन ठरवल्या जाईल. तुमचे मनच तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि जीवनाची दिशा ठरवतात.
मला आठवतं एकदा मी कुठेतरी जात होतो आणि रस्त्यात च्या कडेला मी एक फार मोठे मशीन भयाण आवाज करीत – काम करत असताना पहिले. मशीन एक एका खेपेत जवळपास वीस टन माती उचलत होते, आणि एक लहानसा माणूस steering wheel हातात घेऊन मशीनला नियंत्रित होता. मला अचानक वाटलं की या मशीनची तुलना मानवी-मनाशी होऊ शकते आणि त्या विशाल ऊर्जेचे source, या मन-रुपी मशीनचे नियंत्रण, आपल्या स्वतः च्या हातात आहे. आता तुम्ही हातावर हात ठेवून बसणार आणि या सामर्थ्यवान मशीनला त्याच्या भरवशावर सोडून कुठल्याश्या खड्ड्यात जाऊ देणार? की तुम्ही दोन्ही हात त्याच्या steering wheel वर मजबुतीने पकडून, त्याची ताकत विशेष ध्येया साठी लावणार आहात? हे दोन्ही पर्याय तुमच्या जवळ आहेत, कारण तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसले आहात आणि मशीनचे नियंत्रण तुमच्या हातात आहे. आता पाहिलंत ना तुम्ही? आपल्याला यशस्वी करणारा मंत्र सुद्धा एखाद्या दुधारी तलवारी सारखा आहे.
आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. विचारांचा हा नियम एकीकडे माणसाला यश, सुख आणि समृद्धीकडे घेऊन जातो, त्याला जीवनात तो सगळा आनंद देतो – ज्याचा त्याने स्वतः साठी व कुटुंबा साठी स्वप्न पाहिलं होते, दुसरीकडे हाच नियम त्याला गटर मध्ये सुद्धा ढकलू शकतो.
सगळं काही यावर अवलंबून आहे कि मनुष्य कश्या पद्धतीने या नियमाचा वापर करतो. हेच आहे जगातलं सर्वात आश्चर्यकारक रहस्य.
आता प्रश्न असा आहे कि – मी याला आश्चर्यकारक का म्हणू? आणि रहस्य सुद्धा का म्हणू ?
वास्तविक पाहता हे रहस्य तर अजिबात नाही. फार पूर्वी कुणी बुद्धिमान व्यक्तीने या नैसर्गिक नियमाची ची खरी बाजू प्रमाणित केली होती आणि नंतर पूर्ण बायबल मधे याचा वेळोवेळी उल्लेख आढळतो. परंतु खूप कमी लोकांनी याला समजून आणि शिकून घेतले. हेच कारण आहे, कि हे लोकांसाठी आश्चर्य कारक आहे आणि याच कारणासाठी हे रहस्यच राहिले.
मला वाटत कि तुम्ही तुमच्या शहराच्या गल्लीत जाऊन आणि एक-एक करून प्रत्येक व्यक्तीला विचारले कि “यशाचं रहस्य काय आहे?” – तर महिन्या भराच्या प्रयत्नानंतर अशी एक व्यक्ती सुद्धा तुम्हाला आढळणार नाही, जी तुम्हाला हे सांगू शकेल. आज आपण जे काही जाणून घेतले आहे, ते समजून घेऊन जर आपल्या जीवनात प्रत्यक्षात आमलात आणू शकलो तर ते आपल्या साठी खूप मौल्यवान आहे.
हे फक्त आपल्यासाठीच नाही, तर आपल्याशी संबंधित आणि आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वपूर्ण आहे. जीवन हे रसहीन आणि कंटाळवाणे नाही, तर ते एक रोमांचक adventure सारखे असले पाहिजे. माणसाला स्वतःच जीवन आनंदाने भरभरून जगायला पाहिजे. त्याने सकाळी उठल्या नंतर आनंदी असायला पाहिजे. त्याने स्वतःच्या आवडीचा व्यवसाय केला पाहिजे, कारण तो त्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने करू शकतो.
एकदा मी एका दैनिकाच्या च्या संपादकांचे व्याख्यान ऐकले. त्यांनी समारोप करतांना जे म्हटलं ते मी कधीच विसरू शकत नाही. ते म्हणाले होते की “माझ्या व्यवसायात मला बऱ्याच गोष्टी कळल्या, एक तर हे – की लोकं मुळात चांगले असतात आणि हे सुद्धा – की आपण सर्व कुठून तरी आलो आहोत, आणि आपल्याला कुठे तरी जायचे आहे. म्हणूनच या सृष्टीतला हा मधला वेळ, हा आपल्याला एक रोमांचक adventure असल्या सारखा घालवायचा आहे”. त्या सृष्टी तयार करणाऱ्याने अमुक एखाद्या ठिकाणी पोहचण्यासाठी कुठली एखादी शिडी तयार केलेली नाही. परंतु त्या महान शिक्षकाने, त्या सृष्टी तयार करणाऱ्याने, वेळो-वेळी या गोष्टीची प्रचिती दिली आहे कि तुम्ही जो विचार कराल तो विचार तुमच्या समोर सत्य होऊन अवतार घेईल.
मी तुम्हाला आता एका परीक्षेची संधी देऊ इच्छितो.
हि परीक्षा ३० दिवसांची असेल. जर तुम्ही चांगली परीक्षा दिलीत तर हि परीक्षा तुमच्या जीवनाला सगळ्यात चांगली कलाटणी देईल.
सतराव्या शतकात परत येऊ या, जेव्हा महान वज्ञानिक Sir Isaac Newton यांनी आपल्याला भौतिक शास्त्राचे चे काही नियम सांगितलेत. जे मानवा वर सुद्धा तेवढ्याच प्रखरतेने लागू होतात जेवढे निसर्गाच्या इतर गोष्टींवर. या नियमांमधे एक नियम असा आहे, कि प्रत्येक क्रियेची तेवढीच समान व प्रतिकूल प्रतिक्रिया होत असते. हा नियम आपल्यावर लागू करायचे करायचा असेल तर त्याचा अर्थ असा होईल कि किंमत मोजल्या शिवाय आपण काहीही मिळवू शकत नाही.
३० दिवसाच्या तुमच्या प्रयत्नांचा निकाल अगदी त्याच प्रमाणात असेल, ज्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न केले असतील. उदाहरणार्थ: एक डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला बरेच वर्षे कठीण मेहनत घ्यावी लागेल आणि अभ्यास करण्याची किंमत मोजावी लागते. त्याच प्रमाणे, इतरांना समजावण्यात आणि सहमत करण्यात, किंवा विक्रीच्या व्यवसायत सुद्धा,आपले यश या गोष्टीवर अवलंबून असते कि वस्तूंना विकण्याची किंवा concepts इतरांपर्यंत पोहिचवण्याची किंवा स्वीकृत करण्याची, आपली किती क्षमता आहे.
परंतु इतरांना चांगलं जीवन प्राप्त करण्याची पद्धत समाजविण्यात, आपले यश या गोष्टींवर अवलंबून आहे कि आपण आपल्या प्रयत्नांमध्ये किती किंमत मोजतो आहे, आणि हि किंमत देण्याची आपली तयारी सुद्धा असली पाहिजे. आता प्रश्न असा आहे, की हि किंमत काय आहे? यात बऱ्याच गोष्टी आहेत:
पहिली ही कि आपल्याला बौद्धिक आणि भावनात्मक दृष्ट्या हे समजून घ्यायला पाहिजे, कि आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. म्हणून, आपल्या जीवनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आपले विचार नियंत्रित करावे लागतील. म्हणजेच आपल्याला हे स्पष्टपणे समजून घ्यावं लागेल कि आपण जे पेरणार आहोत, तेच कापणार आहोत.
दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या मनातून सगळ्या अडी -अडचणींना आणि बेड्यांना काढून फेकावं लागेल. आणि हा विचार करून कामाला पुढे न्यावं लागेल कि हेच काम आपल्यासाठी दैवी रूपाने निश्चित झालेले आहे. थोडक्यात, हे समजून घ्यावं लागेल कि सर्व मर्यादा आपण स्वतः तयार केल्या आहेत आणि आपल्या पुढे आपल्या कल्पना शक्तीपेक्षा मोठ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजेच आपल्याला, आपले सर्व मर्यादित विचार, किंवा समज-गैरसमज इत्यादी च्या पुढचा विचार करायचा आहे.
तिसरी गोष्ट, आपल्या समस्येवर सकारात्मक विचार करण्यासाठी, स्वतःला प्रेरित करण्यासाठी पूर्ण क्षमता व हिमंतीचा उपयोग करावा लागेल. आणि त्याच बरोबर स्वतः साठी एक स्पष्ट ध्येय निश्चित करण्यासाठी सुद्धा आपल्या क्षमता व हिमतीचा वापर करावा लागेल.
तुमच्या मनाला ला तुमच्या ध्येया बद्दल सगळ्या संभाव्य बाजुंनी विचार करण्याची संधी दयावी लागेल. तुमच्या कल्पना शक्तीला खुले सोडावे लागेल म्हणजेच ते सर्व संभाव्य उपायांची पारख करू शकेल.
तुमच्या ध्येय प्राप्तीच्या मार्गावर कधी कुठली एखादी परिस्थिती तुम्हाला हरवू शकते हे नाकारावे लागेल. जेव्हा ध्येयाकडे नेणारा मार्ग तुम्हाला स्पष्ट दिसेल, त्या वेळेस तत्परतेने निर्णय घेऊन कामे करावी लागतील आणि स्वतःला हे सांगत राहावे लागेल कि तुम्ही तुमच्या उपलब्धी च्या अगदी मधोमध उभे आहात.
आणि चोथी गोष्ट म्हणजे तुमची जी काही मिळकत असेल त्यातील १० टक्के निश्चितपणे वाचवा. हे नेहमी लक्षात ठेवा, कि तुमचा जो काही व्यवसाय आहे, जर तुम्ही किंमत मोजायला तयार आहात, तर त्यात बऱ्याच शक्यता आहेत.
आता एक आश्चर्यकारक जीवन प्राप्त करण्यासाठी, आपल्या प्रत्येकाला ज्या महत्वाच्या गोष्टींची किंमत मोजायची आहे, त्यांची उजळणी करू – आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते – या वर आपला विश्वास ठेवा. कल्पना या शब्दा चे महत्व समजून घेऊन आणि आपल्या मनाला ला उंच भरारी घेऊ द्या. साहस – दररोज आपल्या ध्येयावर एकाग्रचित्त व्हा. जी काही मिळकत असेल त्यातील १० टक्के वाचवा.
त्याच बरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, की जो पर्यंत आपण कुठलेही विचार अंमलात आणत नाही, तो पर्यंत ते विचार व्यर्थ आहेत.
आता मी ३० दिवसाच्या परीक्षणाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनात हे स्पष्ट असुद्या की या परीक्षेत तुम्ही काहीही गमवणार नाहीत, उलट हे शक्य आहे की तुम्ही सर्वकाही मिळवू शकता. दोन गोष्टी आपल्या सगळ्यांवर लागू होतात – (१) आपल्या प्रत्येकाला काहीतरी हवे आहे आणि (२) आपल्यापैकी प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटत असते.
तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीं पैकी, कुठली गोष्ट तुम्हाला सर्व प्रथम पाहिजे आहे ते तुम्ही एका कार्ड वर लिहावे असे मला वाटते. कदाचित ते रुपये-पैसे असतील, तुम्हाला तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल, किंवा तुम्हाला विशिष्ट प्रमाणात पैसे कमवायचे असतील, कदाचित तुम्हाला एक छान घर पाहिजे असेल, किंवा तुमच्या व्यवसायात यश मिळवायचे असेल, किंवा जीवनात एक विशिष्ट उंची गाठायची इच्छा असेल, किंवा मग कुटुंबा मध्ये चांगला ताळमेळ किंवा ऐक्य असावे अशी इच्छा असेल. आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची इच्छा नक्कीच असते.
तुम्ही तुमच्या कार्ड वर स्पष्ट पणे लिहा, कि तुमची काय इच्छा आहे. आणि हेच तुमचे एकमात्र ध्येय आहे, हे निश्चित ठरवा. तुम्ही तुमचे हे कार्ड कुणाला हि दाखवू नका, ते तुमच्या जवळच ठेवा म्हणजे तुम्ही तुमच्या कार्डाला दिवसभरातून हवे तेंव्हा बघु शकता.
कार्डावर लिहलेल्या ध्येयाचा, रोज सकाळी उठल्यावर प्रफुल्लित आणि शांत चित्ताने विचार करा. दिवसभऱ्यातून जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा या कार्ड ला बघा आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा बघा. कार्ड बघताना हे नेहमी लक्षात ठेवा कि आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. आणि आता तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करत असल्यामुळे तुमच्या ध्येयाला तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात हे समजून घ्या.
वास्तविक पाहता, जेव्हा तुम्ही तुमची इच्छा कार्डा वर लिहली, आणि त्या बद्दल विचार करायला सुरुवात केली, त्याच क्षणा पासून ते ध्येय तुमचे झाले. जेव्हा तुम्ही कामा निमित्त बाहेर पडता तेव्हा तुमच्या आजू बाजूला असलेल्या विपुलतेकडे बघा, या विपुलतेवर तुमचाहि तेवढाच हक्क आहे जेवढा इतरांचा. जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न केलात, तर ही विपुलता तुमची होऊ शकते.
आता आपण थोड्या कठीण भागा कडे वळूया – कठीण अशासाठी कि या करिता तुम्हाला काही नवीन सवयी विकसित कराव्या लागतील, आणि नवीन सवयी लावून घेणे सहज शक्य नसते. पण एकदा का नवीन सवयी लागल्यात तर त्या आयुष्यभर तुमच्या सोबत असतात. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते, त्या बद्दल विचार करणे बंद करा. जेव्हा भयानक किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात तेंव्हा त्या जागी स्वतः च्या सकारात्मक आणि महत्वपूर्ण ध्येयाचा विचार व त्याची सजीव कल्पना तुमच्या मनात आणा. हे सगळे करत असतांना असेही हि होईल कि तुम्हाला वाटेल कि हे सगळे सोडून द्यायला पाहिजे – कारण माणसासाठी सकारात्मक विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचार करणे जास्त सोपे असते. आणि हेच एक कारण आहे कि फक्त ५ टक्के लोकं यशस्वी होतात. तुमचा प्रयत्न असला पाहिजे कि तुम्हाला या ५ टक्यां मध्ये तुमची जागा निर्माण करायची आहे.
या ३० दिवसांत, तुमच्या मनाचे चे नियंत्रण पूर्ण पणे तुमच्या हातात असलं पाहिजे. या दरम्यान तुमच्या मनात तोच विचार आला पाहिजे ज्याची परवानगी तुम्ही द्याल. ३० दिवसाच्या या परीक्षणा दरम्यान, रोज तुम्हाला जेवढे काम करायचे असते त्या पेक्षा जास्त काम करा. याशिवाय स्वतः च्या मनाला उत्साही व सकारत्मक ठेवण्यासाठी पहिले पेक्षा जास्त प्रयत्न करा. हे करताना एक गोष्ट लक्षात असुद्या – जीवनात ज्या प्रमाणात तुम्ही द्याल, त्याच प्रमाणात तुम्हाला मिळेल.
ज्या क्षणी तुम्ही एखाद्या ध्येया च्या मार्गाने काम करायला सुरुवात करता, त्याच क्षणी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झालात. कारण तुम्ही त्या क्षणी त्या यशस्वी व्यक्तींच्या च्या श्रेणीत येता – ज्यांना माहिती आहे की ते कुठे जात आहेत.
म्हणजेच ध्येय निश्चित केल्यावर, तुम्ही प्रत्येक १०० लोकां पैकी टॉप च्या ५ लोकां मधे गणले जाता. “ध्येय प्राप्ती कशी होईल?” अशा विचारांत स्वतःला जास्त गुंतवू नका – या प्रश्नाला संपूर्णतः त्या शक्तीवर सोडा जी तुमच्या पेक्षा जास्त समर्थ आहे. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे कि तुम्ही कुठे जात आहात आणि कुठल्या दिशेने जात आहे. बाकी सर्व प्रश्न जस-जसे तुमच्या समोर येतील त्यांची उत्तरं सुद्धा तुम्हाला आपोआप मिळत जातील.
तुम्ही धर्मउपदेशाचे हे शब्द लक्षात ठेवा आणि त्याला परीक्षणा दरम्यान रोज तुमच्या समोर ठेवा.
प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल
शोधा आणि ते तुम्हाला सापडेल
दरवाजा ठोठवा आणि तो उघडेल
कारण प्रत्येक अशी व्यक्ति, जिच्या जवळ जिज्ञासा असते – उत्तर मिळविते. जी व्यक्ती शोध घेते – तिला ते प्राप्त होते आणि जी व्यक्ती दार ठोठावते – तिच्यासाठी ते उघडते.
हे शब्द जितके सोपे आहेत तेवढेच चमत्कारी सुद्धा आहेत. प्रत्यक्षात हा सिद्धांत एवढा सरळ आहे कि आपल्या कठीण शब्दां मध्ये अडकून त्याला समजणे कदाचित थोडे अवघड होऊ शकते.
मात्र तुमच्या साठी हे गरजेचे आहे, कि या ३० दिवसां दरम्यान तुमच्या समोर स्पष्ट ध्येय असले पाहिजे आणि त्याला पूर्ण करण्याचा विश्वास सुद्धा. मग तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल, या ३० दिवसांत तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करा, जसे तुम्ही आतापर्यंत याआधी कधीही केले नसेल. दररोज तुमचे ध्येय तुमच्या समोर ठेवा, त्यांनतर जीवनाचा जो नवीन पैलू तुमच्या समोर असेल त्यावर तुम्हाला स्वतः ला आश्चर्य वाटेल.
प्रसिद्ध संपादिका आणि लेखिका Dorothea Brande ने स्वतः साठी हे रहस्य शोधून काढलं. त्याचं पुस्तक “Wake up And Live!” या मध्ये त्यांनी या बद्दल लिहलं आहे. त्यांचे संपूर्ण चिंतन-मनन जणू पुढील शब्दात सामावले आहे – त्या म्हणतात:
अशा पद्धतीने काम करा जणू अयशस्वी होणे अशक्य आहे.
Dorothea ने त्यांच्या परीक्षणाचा अवधी प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पूर्ण केला आणि आश्चर्य कारक यशाने त्यांच्या पूर्ण जीवनात बदल घडून आला.
आता तुम्ही ३० दिवसां पर्यंत तुमची परीक्षा सुरु ठेवा, परंतु जो पर्यंत तुम्ही स्वतःला या परीक्षेसाठी पूर्ण पणे तयार करत नाहीत, तो पर्यंत या परीक्षेला सुरवात करू नका. तुम्हाला लक्षात येईल कि तुमच्यातल्या चिकाटी आणि एकाग्रतेमुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. “चिकाटी व एकाग्रता हे आत्मविश्वासाचे दुसरं नाव आहे” असेही तुम्ही म्हणू शकता.
जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कधीच एकाग्रचित्ताने काम करू शकणार नाही. या- ३० दिवसाच्या परीक्षणा दरम्यान जर तुम्ही अयशस्वी झालात, म्हणजेच नकारात्मक विचाराने पराजित झालात, तर पुन्हा सुरु करा. हळू हळू तुम्हाला नवीन सवय लागेल, आणि तुमची त्या लोकांमध्ये गणना केल्या जाईल ज्यांच्या साठी काहीही अशक्य नाही.
तुमच्या कार्डाला विसरू नका. जेव्हा तुम्ही जगण्याची हि नवीन पद्धत सुरु करता तेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे.
या कार्डाच्या एका बाजूला तुमचे ध्येय लिहा आणि दुसऱ्या बाजूला धर्मउपदेशाच्या या ओळी लिहा –
प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल, शोधा आणि ते तुम्हाला नक्की सापडेल, दार ठोठवा व तुमच्या साठी ते उघडेल.
परीक्षणा दरम्यान आपल्या फावल्या वेळात प्रेरक पुस्तके वाचा, ते तुमच्या खूप उपयोगात येईल. जीवनात कधीच कुठलेही महान काम प्रेरणे शिवाय पार पडले नाही. हे लक्षात ठेवा कि परीक्षण अवधीच्या ३० दिवसां दरम्यान, तुमची प्रेरणा – हि तुमची सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कि तुम्ही चिंता अजिबात करू नका, कारण चिंता भय निर्माण करते आणि भय जीवन नष्ट करते.
लक्षात ठेवा, तुमच्या समोर तुमचे ध्येय एकदम स्पष्टपणे असले पाहिजे – उर्वरित सगळ्या गोष्टी स्वतःहून स्पष्ट होतील. हे हि लक्षात ठेवा कि तुम्ही नेहमी शांत आणि प्रसन्न चित्त असायला पाहिजे. कुठल्याही लहान-सहान गोष्टींना वाव देऊ नका जेणे करून तुम्ही अस्वस्थ व खिन्न व्हाल आणि तुम्ही तुमच्या मार्गातून बाहेर निघाल. – परीक्षण आव्हानात्मक आहे असे लक्षात आल्यावर कुणी म्हणेल कि “मी हे सगळे का करू?”. हे बघा – जीवनात कुणीही अयशस्वी होऊ इच्छित नाही. अपयश कुणालाच नको असते. चिंता आणि नैराश्याने ग्रासलेले किंवा भयभीत जीवन कुणालाही नको असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा कि तुम्ही जे पेराल तेच कापाल. जर तुम्ही नकारात्मक विचारांचे पेरणी केलीत, तर तुमचे मन नकारत्मक विचारांनीच भरलेले असेल. आणि जर तुम्ही सकारात्मक विचारांची पेरणी केलीत तर तुमचे जीवन प्रसन्नचित्त, यशस्वी व सकारात्मक होईल.
आता अजून एक गोष्ट – नेहमी असे पाहावयास मिळते कि, ऐकलेल्या गोष्टी आपण हळू-हळू विसरतो. म्हणून अधून-मधून या रेकॉर्ड ला ऐकत राहा आणि स्वतः ला आठवण करून देत राहा कि नवीन सवयी लावून घेण्यासाठी तुम्हाला काय काय करायचे आहे. नियमित अंतराने सह-कुटुंब हे ऐका, तुम्हाला असे खूप लोकं भेटतील, जे म्हणतील कि अशा नियमांना समजून न घेताच त्यांना पैसे कमवायचे आहेत. हे असे लोकं आहेत ज्यांना कसलीही मेहनत न करता, काहीही किंमत न मोजता, फुकटात खूप काही कमवायचे आहे. आणि असे लोकं जीवनात अयशस्वी असतात.
अर्थपूर्ण व स्वाभाविकपणे पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे “लोकांना आवश्यक आणि उपयुक्त असलेल्या सेवा किंवा उत्पादने प्रदान करणे”. आपण आपले products आणि services चे देवाण-घेवाण सुद्धा लोकांच्या पैशाने करतो. म्हणून प्रामाणिक नियमा प्रमाणे, आपल्याला त्याच प्रमाणात आर्थिक फायदा होईल ज्या प्रमाणात आपण लोकांची सेवा करू.
पैसे कमविलेत म्हणजे यश मिळवले असे नाही. या उलट, यशाच्या फलश्रुतीचे रूपांतर पैसे कमविण्यात होते. आणि यश आपल्याला त्याच प्रमाणात मिळते ज्या प्रमाणात आपण मेहनत घेऊ, लोकांना आपल्या सेवा उपलब्ध करू. बहुतांश लोकांचा समज या उलट आहे. “तुम्ही भरपूर खूप पैसे कमावता – मग तुम्ही यशस्वी आहात! “असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात यश मिळाल्या नंतरच आपण पैसे कमवू शकतो. नाही तर त्या माणसा सारखे होईल, जो शेकोटी जवळ बसून म्हणतो कि “पहिले मला उब मिळू द्या, नंतरच मी शेकोटीत लाकडं टाकेन”. तुम्हाला काय वाटते? आज जगात किती लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असेल? त्यांची संख्या करोडो-अरबो मधे असेल. वास्तविक पाहता आपण समजायला पाहिजे कि इंधन टाकल्यावरच उब मिळेल.
अगदी याच प्रमाणे आपल्याला अगोदर आपल्या सेवा कार्या कडे लक्ष दयायला पाहिजे आणि मग पैश्याची ची अपेक्षा केली पाहिजे. स्वतःची तुलना कधीच पैशाने करू नका, या उलट मेहनत, कार्य, सेवा, स्वप्ने या सर्वांना साकार करण्याची प्रबळ इच्छा बाळगा. तुम्ही असं करून बघा, मग पहा तुमच्या जवळ किती मोठी संपत्ती आणि समृद्धी येईल.
समृद्धी सुद्धा परस्पर देवाण-घेवाणीच्या नियमावर आधारित आहे.
कुठलीही व्यक्ती जी समृद्धी साठी मेहनत घेते आणि योगदान करते – तीच स्वतःला समृद्ध करते. कधी-कधी असे होऊ शकते, कि ज्यांची तुम्ही सेवा करत आहात त्यांच्या कडून तुम्हाला कुठलीही फलश्रुती होणार नाही – पण कुठल्या तिसऱ्याच गोष्टीतून ती होईल. कारण असा नियम आहे, कि प्रत्येक क्रियेची एक-सारखी आणि प्रतिकूल क्रिया होत असते.
३० दिवसांच्या या परीक्षण अवधीतून एक-एक दिवस पार पडत असतांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा – कि तुमचे यश हे नेहमी त्या सेवा आणि गुणवत्तेने मोजल्या जाईल ज्या तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि पैसा हा फक्त या सेवेला मोजण्याचे एक उपाय आहे. कुठलीही व्यक्ती तो पर्यंत समृद्ध होऊ शकत नाही जो पर्यंत ती इतरांना समृद्ध करणार नाही. या नियमाला कुठलाच अपवाद नाही. एकदा का हा नियम व्यवस्थित समजून घेतला, तर कुणीही विचारशील व्यक्ती स्वतः चे भाग्य स्वतः बदलवू शकते. व त्या व्यक्तीला आणखी जास्त पाहिजे असेल तर तिला आणखी जास्त सेवा द्यावी लागेल. आणि त्या व्यक्तीला कमी पाहिजे असेल तर तिला कमी सेवा करावी लागेल.
हीच ती किमत आहे, जी तुम्हाला तुमच्या इच्छा आणि गरजे साठी चुकवावी लागेल. जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुम्ही इतर लोकांना बाजूला सारून स्वतःला समृद्ध करू शकता, तर हि तुमची चूक आहे. असे केल्याने तुम्ही स्वतःलाच बाजूला सारून घेत आहात. हे अगदी श्वास घेणे आणि सोडणे, अशा सारखे सत्य आहे की – तुम्ही जेवढं द्याल तेवढच तुम्हाला परत मिळेल – तुम्ही या नियमाला बदलू शकता – असा विचार चुकूनही करू नका, कारण ते केवळ अशक्य आहे.
एका सुप्रसिद्ध मनोचिकीत्सकाने यश मिळवण्यासाठी ६ उपाय सांगितले आहे :
१) एक निश्चित ध्येय ठरवा
२) तुम्हाला कमीपणा देणारे नकारात्मक विचार मनातून काढून टाका.
३) त्या सगळ्या गोष्टींवर विचार करणे बंद करा, जे तुमच्या मनात अशी आशंका निर्माण करतात कि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. या ऐवजी त्या गोष्टींचा विचार करा ज्यातून तुमचा यशस्वी होण्याचा आत्मविश्वास वाढतो. .
४) जर नकारात्मक विचार तुमच्या मनावर वर्चस्व गाजवत असतील, तर तुमच्या बालपणा च्या दिवसापर्यंत मागे जा व त्या कारणांना शोधून काढा ज्यामुळे फार पूर्वी पासूनच – तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही – अशी तुमची धारणा झाली आहे.
५) ज्या व्यक्तीला आदर्श म्हणून स्वीकारण्यास तुम्हाला आवडेल – अशा व्यक्तीचे वर्णन लिहा – व तुमची स्वतः ची धारणा बदला.
६) तुम्ही ज्या आदर्श आणि यशस्वी व्यक्तीचे अनुसरण करण्याचे ठरवले आहे, त्या व्यक्ती च्या जागी स्वतःला ठेवून विचार करा आणि त्याचा अभिनय करा.
मानव सभ्यतेच्या च्या ज्ञात इतिहास च्या सुरुवाती पासूनच विशेषज्ञांनी जे काही म्हटले आहे त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भविष्यात जे व्हायचे आहे ते होण्यासाठी किमंत मोजा. हे काम तेवढे कठीण नक्कीच नाही जेवढे कि एका अयशस्वी व्यक्ती च्या रूपात जीवन जगणे होय.
३० दिवसांचे परीक्षण पूर्ण करा, याला पुन्हा करा आणि पुन्हा-पुन्हा करत राहा. म्हणजेच या सवयी तुमच्यात जास्तीत जास्त आत्मसात होतील. आणि एक दिवस असाही येईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल कि तुम्ही इतर कुठल्या पद्धतीने ने कसे काय जीवन जगत होतात.
या नवीन पद्धतीने जीवन जगा आणि विपुलतेचं द्वार तुमच्या समक्ष उघडेल. आणि चारही दिशांनी सुख- समृद्धी चा असा पाऊस पडेल कि ज्याचा तुम्ही स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. पैसे भरपूर मिळतील, पण त्या पेक्षाही जास्त महत्वाची आहे ती शांती. आणि हा नियम आत्मसात केल्यानंतर तुमची गणना त्या अतिशय थोड्या लोकांमध्ये होईल जे शांत, आनंदी आणि यशस्वी जीवन जगत आहेत.
आजपासूनच सुरु करा – लक्षात ठेवा, गमवायला तुमच्याकडे काहीच नाही पण प्राप्त करण्यासाठी एक नवीन जीवन तुमच्या समोर आहे.